Rishabh Pant and Urvashi Rautela news Rishabh Pant and Urvashi Rautela news
मनोरंजन

Rishabh Pant : पंतसाठी उर्वशीने शेअर केला व्हिडिओ? नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या

ऋषभ पंत लक्षात येतंय ना?

सकाळ डिजिटल टीम

Rishabh Pant and Urvashi Rautela news अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ग्लॅमरस व बोल्ड अंदाजातील फोटो तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करीत असते. पुन्हा एकदा उर्वशी चांगली चर्चेत आली आहे. मात्र, यासाठी कारण ठरलंय ते म्हणजे क्रिकेटर ऋषभ पंत. ४ ऑक्टोबर म्हणजेच आज वृषभ पंतचा वाढदिवस आहे. ऋषभच्या वाढदिवसाच्या निमित्तानेच उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

खरंतर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात जोरदार शीतयुद्ध पेटले होते. यावेळी उर्वशीने ऋषभला छोटू भय्या असेही म्हटले होते. मात्र, आता ऋषभच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने उर्वशीने शेअर केलेला व्हिडिओ पाहता दोघांमध्ये आलबेल असल्याच दिसत आहे.

उर्वशीने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओने नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेतलंय. उर्वशीने लाल रंगाचा ड्रेस परिधान केलाय. यात ती खूपच सुंदर दिसतेय. व्हिडिओत तिची बेभान करणारी अदाकारी पाहायला मिळतेय. यात ती शेवटी फ्लाईंग किस देत आहे. उर्मिलाच्या या घायाळ करणाऱ्या अदांसोबतच नेटकऱ्यांच लक्ष वेधलं गेलंय ते म्हणजे तिने व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमुळे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये उर्वशीने 'हॅपी बर्थडे' असं लिहिलंय. सोबतच एक लाल रंगाच्या फुग्याच इमोजी तिने शेअर केलंय. आता या व्हिडिओचा संबंध नेटकरी थेट ऋषभ पंतच्या वाढदिवसाशी जोडत आहेत.

उर्वशीच्या या व्हिडिओवर कमेंट करत लोक म्हणताहेत 'आज RPचा बर्थडे आहे. ऋषभ पंत लक्षात येतंय ना?' उर्वशीने कॅप्शनमध्ये फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने कुणाचंही नाव लिहिलेलं नाही. असं असलं तरी अनेकांनी मात्र तिच्या कमेंट बॉक्समध्ये ऋषभ पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एका युजरने लिहिले 'वहिनी आज ऋषभ भावाचा बर्थडे आहे.' एकीकडे उर्वशीचा व्हिडिओ चर्चेत असतानाच दुसरीकडे ऋषभची गर्लफ्रेंड ईशा नेगीने देखील एक फोटो शेअर करत 'माय लव्ह' म्हणत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उर्वशी ऋषभमधील वाद

उर्वशी रौतेलाच्या एका मुलाखतीनंतर उर्वशी आणि ऋषभ पंतमध्ये सोशल मीडियावर शाब्दिक चकमक सुरू झाली होती. दोघांनी पोस्टच्या माध्यमातून एकमेकांवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली होती. मुलाखतीदरम्यान ती म्हणाली होती ' मी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये होते. यावेळी मिस्टर आरपी मला भेटण्यासाठी आले होते. तब्बल दहा तास ते हॉटेलच्या लॉबीमध्ये थांबले. शूटिंगमुळे मी खूप थकले होते. त्यामुळे झोपून गेले.

मी फोनही उचलू शकले नाही. जेव्हा सकाळी मी सोळा-सतरा मिस कॉल पाहिले तेव्हा मला खूप वाईट वाटलं की कुणी मला भेटण्यासाठी इतके तास थांबलं होतं.त्यानंतर आम्ही मुंबईमध्ये भेटण्याचा ठरवलं मात्र यावेळी आम्हाला मीडियाने गाठलं. त्यानंतर आमचं नातं संपुष्टात आलं असंही ती म्हणाली होती.

ही मुलाखत चांगलीच व्हायरल झाली, प्रतिसादात ऋषभ पंतने त्याच्या इंस्टाग्रामवर लिहिले की 'कोणीतरी खोट बोलत आहे. प्रसिद्धीसाठी लोक काय काय करतात.' त्यानंतर एका पोस्टमध्ये उर्वशीने ऋषभचा उल्लेख 'छोटू भैया' असा केला होता. तर त्यांनेही 'बहिणीला फॉलो करा' असं म्हणत प्रत्युत्तर दिलं होतं. ही शाब्दिक चकमक बरेच दिवस सुरू होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशीने ऋषभला सॉरी म्हणत माफी देखील मागितली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT