Riteish Deshmukh
Riteish Deshmukh  
मनोरंजन

'औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भररस्त्यात चोपलं पाहिजे'; रितेशचा संताप अनावर

स्वाती वेमूल

कोरोनावर उपचार करण्यासाठी जीवनरक्षक इंजेक्शन असलेल्या रेमडेसिविरची remedesivir injections मोठ्या प्रमाणात काळाबाजारी करण्यात येत आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून या औषधांचा तुटवडा जाणवतोय. या परिस्थितीत रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याचं उघड झालं आहे. नागपूरमधील असाच एक दुर्दैवी प्रकार नुकताच समोर आला आहे. आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रुग्णाला रेमडेसिविरऐवजी चक्क अॅसिडिटीचं इंजेक्शन टोचलं. हा प्रकार पाहून अभिनेता रितेश देशमुखचा Riteish Deshmukh संताप अनावर झाला. 'औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना भररस्त्यात चोपलं पाहिजे', असं ट्विट करत त्याने राग व्यक्त केला. (Riteish Deshmukh on black market of remedesivir injections)

नागपुरातील 'कोविडालय' रुग्णालयात एका नर्सला आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रुग्णाला वाचविण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने तीन रेमडेसिविर इंजेक्शन दिले होते. मात्र, संबंधित नर्सने तीनपैकी दोन इंजेक्शन स्वत:कडे ठेवले आणि त्याऐवजी रुग्णाला चक्क अॅसिडिटीचं इंजेक्शन टोचलं. या संपूर्ण प्रकारावर सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

संबंधित नर्ससह इतर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. रितेशच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 'लोकांच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे', अशी मागणी नेटकऱ्यांनी कमेंट करत केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज राम मंदिरात जाऊन घेणार रामलल्लाचे दर्शन

SCROLL FOR NEXT