Riteish-genelia Tuze meri kasam shook then maharashtra Chief Minister Chair Google
मनोरंजन

Riteish-जिनिलियाचा सिनेमा,ज्यामुळे हादरलेली मुख्यमंत्र्यांची खुर्ची

माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा किंवा सून म्हणून रितेश-जिनिलिया कधी मिरवताना दिसले नाहीत,त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धि मिळवली.

प्रणाली मोरे

Genelia D'souza and Riteish Deshmukh: जिनिलिया डिसूझा आणि रितेश देशमुख दोघेही बॉलीवूडच्या क्यूट कपलपैकी एक. हे मात्र खरं आहे की,दोघं सिनेमात दिसो किंवा नाही पण सोशल मीडियावर मात्र त्यांच्या रीलचा टीआरपी पहिल्या नंबरवर कायम पहायला मिळतो. रितेश आणि जिनिलियाच्या नात्याला २० वर्षाहून अधिक काळ झाला आहे. २००३ मध्ये दोघांचा 'तुझे मेरी कसम' हा सिनेमा रिलीज झाला होता. याच सिनेमाच्या निमित्तानं दोघांची पहिली भेट झाली. पहिल्या भेटीत दोघांनाही फारसं एकमेकांविषयी काही वाटलं नव्हतं पण त्यानंतर हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीतच दोघांमध्ये प्रेम झालं,आणि त्यानंतर २०१२ मध्ये दोघांनी लग्न केलं. तुझे मेरी कसम हा सिनेमा रितेशचा डेब्यू सिनेमा होता. तर साऊथ सिनेमांची स्टार जिनिलिया या सिनेमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करत होती.(Riteish-genelia 'Tuze meri kasam' shook then maharashtra Chief Minister Chair)

तुझे मेरी कसम हा सिनेमा २००३ मध्ये हिट झाला तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. कोणीच कल्पना केली नव्हती की महाराष्ट्राचे तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा सिनेमात येईल आणि स्टार होईल. अर्थात स्वतः विलासराव देशमुखांनाही याबाबत शाश्वती नव्हती. म्हणूनच परदेशातील आर्किटेक्चरची नोकरी सोडून भारतात सिनेमात नशीब आजमवायला आलेल्या रितेशला विलासरावांनी म्हटलं होतं,'तुला एक संधी देत आहे. प्रय़त्न कर,हिरो बनलास तर ठीक आहे, सिनेमा आपटला तर पुन्हा सिनेमाचं नाव माझ्यासमोर काढायचं नाही'.

तुझे मेरी कसम हा कॉलेज लव्ह स्टोरीवर आधारित सिनेमा म्युझिकल हिट ठरला. थिएटरमध्ये चालूनही या सिनेमाला कधी डिव्हीडीवर रिलीज केले गेले नाही. इतकंच नाही,तर या सिनेमाला ब्रिटन आणि कॅनडातही ठरवून रिलीज केलं गेलं नाही. मात्र याचं कारण कधीच कुठे समोर आलं नाही.

हा सिनेमा तेलुगु ब्लॉकबस्टर सिनेमा 'नुव्वे कवाली'चा रीमेक होता. या सिनेमात रितेश,जिनिलिया सोबत बिपाशा बासुनेही कॅमियो केला होता. सिनेमात एक सीन आहे,ज्यात जिनिलियाची व्यक्तिरेखा रितेशला सहा वेळा कानाखाली मारते. मजेदार गोष्ट ही आहे की, हा सीन दिग्दर्शकाकडून ओके झाला होता पण तरी देखील रितेशने य़ा सीनला पुन्हा शूट करण्याचा हट्ट धरला. पण यामुळे त्याचा गाल मात्र चांगलाच लाल झाला होता.

विलासराव देशमुख हे कॉंग्रेस पक्षाचे नेते होते. १९९९ ते २००३ आणि २००४ ते २००८ या कालावधीत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. २००३ ला रितेशचा तुझे मेरी कसम रिलीज होण्याआधी विलासराव देशमुख यांच्यावर विरोधी पक्षानं गंभीर आरोप लावले होते. बोललं गेलं होतं की विलासराव देशमुख आपल्या अधिकारांचा चुकीचा वापर करत मुलाच्या सिनेमाला प्रमोट करत आहेत. इतकंच नाही,तेव्हा असाही आरोप केला गेलेला की महाराष्ट्रातील जास्तीत जास्त स्क्रीन रितेशच्या सिनेमाला मिळाव्यात म्हणून विलासरावांनी अधिकारांचा चुकीचा वापर करत थिएटर्स ओनर्सवर जोर-जबरदस्ती केली आहे. हा विरोधाचा सूर इतका जोरदार लावण्यात आला की त्यावेळी विलासराव देशमुखांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली गेली होती. पण त्यावेळी विलासराव देशमुख आण रितेश देशमुख या दोघांनीही या आरोपांचे खंडन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

SCROLL FOR NEXT