Riteish Deshmukh, Genelia D'Souza
Riteish Deshmukh, Genelia D'Souza  Google
मनोरंजन

जेनेलियाला इंटरनेट स्पीड वाढवण्याबाबत रितेशचा अजब सल्ला;व्हिडीओ पहा

प्रणाली मोरे

रितेश देशमुख(Riteish Deshmukh) आणि जेनेलिया डिसोझा(Genelia D'Souza) हे बॉलीवूडचं एक हॅपनिंग कपल. लग्नाला दहा वर्ष होऊन गेली तरी नवरा-बायको म्हणून यांच्यातलं प्रेम दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. तसं यांच्या लग्नाआधीपासूनच हे दोघे अनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. त्यांची प्रेमकहाणी ही एक वेगळी बातमी होऊ शकेल. खरंतर जेनेलिया आणि रितेशमध्ये वयाचं फार अंतर असूनही त्यांच्यातील समजूतदारपणामुळे ते कधी दिसून आलं नाही. म्हणजे सेलिब्रिटी कपल्सचे चव्हाट्यावर येणारे वाद या दोघांमध्ये कधीच झाले नाहीत. त्यांच्या संसाराचं ते मोठ यश म्हणावं लागेल. आपल्या दोन मुलांसोबत फॅमिली टाईम एन्जॉय करतानाही ते नेहमी दिसतात. सोशल मीडियावर तर त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओ रीलचा नेहमीच बोलबाला असतो.

पुन्हा रितेशचा जेनेलियासोबतचा एक नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जेनेलिया फोनवर काहीतरी सर्च करताना दिसत आहे. पण तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तिला काहीतरी अडचण आहे असं दिसून येतंय. या व्हिडीओत जेनेलिया रितेशला म्हणतेय, ''सुनो ना,मेरा इंटरनेट बहुत स्लो चल रहा है|''त्यावर रितेश पटकन म्हणाला,''जबान से कनेक्ट कर ले....'' यावर जेनेलिया मात्र भडकलेली दिसत आहे. रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तो व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांचीही हसून पूरती वाट लागली आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया चाहत्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT