ved, pathaan, shah rukh khan, riteish deshmukh SAKAL
मनोरंजन

Ved Movie Box Office Collection: रितेश देशमुखचा 'वेड' शाहरुखच्या 'पठाण'ला देतोय कडवी टक्कर

वेड ची आता पाचव्या आठवड्यात दमदार एंट्री झाली आहे.

Devendra Jadhav

Ved Movie Box Office Collection: शाहरुख खानचा पठाण सिनेमा रिलीज होऊन अवघे काहीच दिवस झाले आहेत. भारतभरात पठाणची जोरदार हवा आहे. असं वाटत होतं कि पठाण मुळे इतर सिनेमांचं बस्तान बसेल. पण रितेश देशमुखचा वेड मात्र पठाणला कडवी टक्कर देतोय. वेड ची आता पाचव्या आठवड्यात दमदार एंट्री झाली आहे. वेडने पाचव्या आठवड्यातल्या शुक्रवारी तब्बल ५७ कोटी रुपये कमावले आहेत.

वेड च्या पाचव्या आठवड्यातला बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. वेड चा गेल्या आठवड्यातला बॉक्स ऑफिस रिपोर्ट वर नजर मारली तर वेडने विकेंड मध्ये एकूण ४ कोटींची कमाई केली. याशिवाय सोमवारी ५२ लाख , मंगळवारी ४१ लाख, बुधवारी २१ लाख आणि गुरुवारी ५५ लाख आणि शुक्रवारी २४ लाख अशी कमाई केली. त्यामुळे वेड ने आतापर्यंत एकूण ५७.१५ कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे पठाण च्या समोर वेड थेटरमध्ये ठाण मांडून आहे

पहिल्या दिवसापासूनच 'वेड'नं बॉक्स ऑफिसवर त्याची घट्ट पकड निर्माण केली होती. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २ कोटी २५ लाखांचा गल्ला जमवला. त्यानंतर पहिल्या आठवड्यात २० कोटींचा पल्ला गाठला. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने ४० कोटींचा टप्पा पार केला आणि तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने तब्बल ५० कोटींची कमाई केली.

'वेड' हा सिनेमा नागा चैतन्य आणि सामंथा यांच्या 'मजिली' या तेलुगू सिनेमावर आधारित आहे. वेड जरी रिमेक नसला तरीही रितेश आणि जिनिलियाचा जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे‌. वेड सिनेमात रितेश - जिनिलिया सोबत वेड मध्ये जिया शंकर, अशोक सराफ, विद्याधर जोशी अशा कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुपरस्टार सलमान खानचं विशेष गाणं सिनेमात भाव खाऊन जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan: घर खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! डाउन पेमेंटशिवाय घर घेता येईल का? आरबीआयचे नियम काय सांगतात? जाणून घ्या...

IND vs NZ, 1st T20I: न्यूझीलंडने जिंकला टॉस! भारताच्या संघात इशान किशन, रिंकू सिंगचे पुनरागमन, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग-११

Zomato चे नवे CEO अलबिंदर ढींडसा कोण आहेत? 10000 कोटींचे मालक; दीपिंदर गोयलला विकली होती कंपनी

Latest Marathi News Live Update : म्हाडा मुंबई मंडळाच्या ८४ अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलावाला मुदतवाढ

कशी होते 'बिग बॉस मराठी'च्या स्पर्धकांची निवड? क्रिएटिव्ह डिरेक्टरने सांगितली आतली गोष्ट; म्हणतो- बिग बॉस तुम्हाला शोधतं...

SCROLL FOR NEXT