rohit shetty
rohit shetty 
मनोरंजन

ऍक्शन-थ्रीलर वेब सिरीजसोबत दिग्दर्शक रोहित शेट्टी करणार डिजीटल विश्वात पदार्पण

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलीवूडला ऍक्शन पॅक सिनेमे देणारे दिग्दर्शक रोहित शेट्टी आता नवीन वर्षात नवीन सुरुवात करणार आहे. रोहित शेट्टी आता डिजीटल विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दिग्गज स्टंटमॅन एमबी शेट्टी यांंचा मुलगा रोहित शेट्टी 'सिंघम', 'सिंबा', 'होलमाल', 'चेन्नई एक्सप्रेस' आणि 'ऑल द बेस्ट' सारख्या सिनेमांसाठी प्रसिद्ध आहे. 

रोहित शेट्टीने तसं पाहायला गेलं तर ऍक्शन-ऍडवेंचर शो 'फियर फॅक्टर: खतरो के खिलाडी' या शोसोबत छोट्या पडद्यावरही एंट्री केली आहे. सिनेमाच्या टीममधील एका सुत्राने सांगितलं की रोहित शेट्टी आठ एपिसोड असणारी ऍक्शन थ्रीलर वेब सिरीज बनवणार आहे. ही सत्य घटनांवर आधारित असेल. या वेबसिरीजच्या नावाचा अजुन खुलासा झालेला नाही. रोहित सध्या त्याचा सिनेमा 'सर्कस'मध्ये बिझी आहे. या सिनेमात रणवीर सिंह आहे. हा सिनेमा विल्यअम शेक्सपिअर यांचं नाटक 'द कॉमेडी ऑफ एरर्स'वर आधारित आहे. हा प्रोजेक्ट एक कॉमेडी सिनेमा आहे.

लॉकडाऊनमधील रिकाम्या वेळेत रोहित शेट्टीने या सिनेमाच्या स्क्रीप्टवर काम केलं आहे. या सिनेमाची एक छोटीशी कल्पना त्याने रणवीर सिंहसोबत शेअर केली. जेव्हा रोहित शेट्टी यांनी रणवीर सिंहला या सिनेमाबाबत सांगितलं तेव्हापासून तो या सिनेमासाठी उत्सुक आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमात रणवीर सिंह पहिल्यांदा डबल रोल साकारणार आहे. रिपोर्ट्सनुसार हा सिनेमा ८० च्या दशकातील सुपरहिट सिनेमा 'अंगुर'चा रिमेक असेल. यामध्ये रणवीर व्यतिरिक्त वरुण शर्मा, पूजा हेगडे आणि जॅकलीन फर्नांडिस देखील महत्वाच्या भूमिकेत असतील. 

रोहित शेट्टी 'गोलमाल' फ्रँचायजी आणि पोलिस जॉनरमधून बाहेर पडत काहीतरी खास करणार आहे. लॉकडाऊनमध्ये त्याने या कॉमेडी स्क्रीप्टवर खूप काम केलं आहे. 'गोलमाल ५' ची स्क्रीप्ट देखील तयार आहे मात्र 'सूर्यवंशी' रिलीज झाल्यानंतर तो यावर काम सुरु करणार आहे. या सगळ्यात आता वेब विश्वास पदार्पण केल्यानंतर त्याच्या ऍक्शनपॅक वेबसिरीजला कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.  

rohit shetty to debut in digital world with action thriller web series  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT