Aishwarya Rai - Bachchan news
Aishwarya Rai - Bachchan news esakal
मनोरंजन

राजामौलींच्या चित्रपटात ऐश्वर्या रॉय! पुढील चित्रपटातून होणार इंट्री?

युगंधर ताजणे

Bollywood News: बॉलीवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या रॉय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) ही आता टॉलीवूडच्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या चित्रपटामध्ये काम कऱणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली (SS Rajamouli) यांच्या चित्रपटामध्ये ऐश्वर्या भूमिका करणार असल्याची बातमी व्हायरल होताच नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. बाहुबली, आरआऱआर सारखे बिग बजेट आणि ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट करुन (Bollywood Vs Tollywood) दाखवणारे दिग्दर्शक म्हणून राजामौली यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. आता चक्क विश्वसुंदरी ऐश्वर्या त्यांच्या चित्रपटामध्ये भूमिका साकारणार असल्याची बातमी नेटकऱ्यांनी ऐकल्यानंतर (entertainment news) त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ही सध्याच्या घडीला भारतातील सर्वोत्तम दिग्दर्शक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या एस एस राजामौली यांच्या चित्रपटात प्रमुख (RRR movie) अभिनेत्री म्हणून दिसणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राजामौली यांचा यावर्षी आरआरआर हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला आहे. त्यानं यावर्षी आतापर्यत (मे अखेर) सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून वेगळी प्रसिद्धी मिळवली आहे. त्यामुळे राजामौली यांच्या आगामी चित्रपटामध्ये ऐश्वर्या रॉयच्या नावाचा उल्लेख होत असल्याची चर्चा आहे.

ऐश्वर्या ही लवकरच पोन्नियिन सेलवन चित्रपटाममध्ये लीड रोलमध्ये दिसणार आहे. बऱ्याच काळानंतर ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी त्या चित्रपटातील ऐश्वर्याचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोन्नियन सेलवनमध्ये ती डबल रोल साकारणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्यानं सांगितलं होतं की, मला जेव्हा मणिरत्नम यांच्या त्या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा मी घाबरुन गेली होते. त्यांच्या चित्रपटात काम करायचे म्हणजे मोठं धाडसं अंगी बाणवावं लागतं. अतिशय मेहनती दिग्दर्शक म्हणून मणिरत्नम यांचे नाव घ्यावे लागेल. असे ऐश्वर्यानं सांगितले होते. या चित्रपटानंतर ऐश्वर्या ही रजनीकांत यांच्या 169 मध्ये दिसणार आहे.

ऐश्वर्यानं इ टाईम्सशी बोलताना सांगितले होते की, मला पुन्हा अभिषेकसोबत काम करायचे आहे. त्याच्यासोबत आणखी एक चित्रपट करण्याची इच्छा आहे. मला माहिती आहे की आज नाही तर उद्या पुन्हा त्याच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळेल. असा विश्वास ऐश्वर्यानं व्यक्त केली आहे. दुसरीकडे अभिषेकनं देखील ऐश्वर्याची मागणी लवकरच पूर्ण होईल असं म्हटलं आहे. आम्ही एका चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात असल्याचे त्यानं सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT