
RRR: दिग्दर्शक राजामौलींना आता आपल्या चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री नको, कारण...
Tollywood News: भारतातील सर्वात प्रभावी दिग्दर्शकांमध्ये आता एस एस राजामौलींचं नाव (RRR Movie) घेतलं जातं. बाहुबली पासून या दिग्दर्शकानं आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवला आहे. गेल्या महिन्यात त्यांचा रामचरण आणि ज्युनि.एनटीआर यांची भूमिका (S.S.Rajamauli) असलेला आरआरआर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तीन वर्षांपासून या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत होते. तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला. बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांना या आरआरआरनं धक्का दिला. आरआरआरमध्ये बॉलीवूडचे दोन कलाकार होते. अजय देवगण आणि आलिया भट्टच्या (bollywood movie) भूमिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता राजामौली हे टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता महेश बाबुला घेऊन चित्रपट करणार आहे. त्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
सध्या टॉलीवूडचा मोठा प्रभाव बॉलीवूडवर असल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये आरआरआर, पुष्पा, वल्लीमाई, बिस्टचा मोठा वाटा आहे. त्यांनी बॉलीवूडला मात दिली आहे. त्यामुळे बॉलीवूडच्या निर्माते आणि दिग्दर्शक यांनाही चित्रपट प्रदर्शित करताना काळजी घ्यावी लागत आहे. संजय लीला भन्साळी यांचा गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट सोडता बाकीच्या चित्रपटांना फारसं यश मिळालेलं नाही. त्यामुळे यंदाचं वर्षी बॉलीवूडसाठी मोठं आव्हान असणार आहे. यासगळ्यात राजामौली यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे त्यांना आपल्या पुढील चित्रपटामध्ये बॉलीवूडची अभिनेत्री नको आहे. ते आता प्रसिद्ध अभिनेता महेश बाबुला घेऊन एका चित्रपटाची निर्मिती करत असून त्यांनी त्यामध्ये हिंदी चित्रपटाच्या अभिनेत्रीला घेण्यास नकार दिला आहे.
हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेश बाबुला आपल्या चित्रपटांमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रयोग करायचे नाहीत. त्याला सामाजिक विषयांवर चित्रपट निर्मिती करायची आहे. अशावेळी त्यांनी राजामौली यांच्याशी संपर्क साधला आहे. राजामौली दिग्दर्शक हे आपल्या कल्पनेला आकार देऊ शकतात. असं त्याचं म्हणणं आहे. केजीएफ किंवा पुष्पामध्ये ज्या अभिनेत्री होत्या त्या हिंदी प्रेक्षकांसाठी नव्या होत्या. असं असलं तरीदेखील त्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे येत्या काळात बॉलीवूडच्या अभिनेत्रींना घेऊन चित्रपट करण्याची गरज नाही. अशी त्या दिग्दर्शकांची भूमिका झाली आहे. महेश बाबुची सरकारु नावाची फिल्म 12 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा: Poster Viral: 'हरिओम' मधले ते दोन मावळे आहे तरी कोण?
Web Title: Ss Rajamauli New Movie Not Take Bollywood Actress Mahesh Babu Actor Next Project
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..