Rubina Dilaik Pregnant Rubina Dilaik baby bump  Esakal
मनोरंजन

Rubina Dilaik Pregnant: "आम्ही खुप घाबरलो आहोत ..." गरोदरपणाच्या घोषणेनंतर रुबिना पहिल्यांदाच बोलली

Vaishali Patil

Rubina Dilaik Pregnant: टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वीच रुबिनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या गरोदरपणाची घोषणा केली आहे. ती लवकरच आई होणार आहे.

रुबिनाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आणि त्यात ती बेबी बंप फ्लाँट करताना दिसली. आता तिने एक व्हिडिओ शेयर केला ज्यात ती पांढऱ्या रंगाच्या सलवार सूटमध्ये दिसत होती. यामध्ये तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो दिसत आहे.

दरम्यान रुबिनाने तिचा पती अभिनव शुक्लासोबत एक व्लॉग शेअर केला आहे. ज्यात त्यांनी ते त्याच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी किती उत्सूक आहेत याबद्दल सांगितले. त्याचे काही अनुभवही त्यांनी या व्लॉगमध्ये चाहत्यांसोबत शेयर केले आहेत.

याच व्लॉगमध्ये रुबिनाने तिच्या गरोदरपणाबद्दल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यात रुबीना म्हणाली की, "मी सध्या खूप चिंतेत आहे. आम्ही खूप उत्साही तर आहोत मात्र तितकेच तणावातही आहोत."

तर दुसरीकडे अभिनव म्हणाला की तो देखील खुप नर्व्हस आहे पण रुबिना मात्र खुप उत्साही आहे. त्याच्याकडे शब्दच नाही त्याच्या भावना व्यक्त करायला. ही खुप संमिश्र भावना आहे. आता जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. आम्हाला नाही माहीत हे सर्व कसं होणार आहे. असंही तो म्हणाला.

तिच्या बेबीमूनबद्दल बोलतांना रुबीनाने सांगते की, "मी स्वतःसाठी थोडा वेळ काढला आहे, आम्ही याला आमचा बेबीमून म्हणतो आणि मी माझ्या बेबीमूनसाठी आले आहे. इथेच मी सर्वात जास्त मज्जा केली आहे." रुबिनाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रुबिना बद्दल बोलायचं झालं तर तिला 'छोटी बहू', 'शक्ती' या मालिकांमधुन प्रसिद्धी मिळाली. ती बिगबॉसची विजेती आहे. ती 'खतरों के खिलाडी' शोमध्येही दिसली आहे.रुबिना आणि अभिनव शुक्ला यांच्या लग्नाला आता पाच वर्षे झाली आहेत.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : १८ वर्षांखालील व्यक्तींसाठी सोशल मीडिया खात्यांवर निर्बंध असावेत: सर्वोच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT