saba azad hritik roshan girlfriend troll after her dance and singing video viral on lakme fashion week  SAKAL
मनोरंजन

Saba Azad Video: "काय गं बरी आहेस ना?" फॅशन शोला गाणं आणि डान्स केल्याने हृतिकची गर्लफ्रेंड ट्रोल

हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझाद फॅशन शोमध्ये डान्स केल्याने ट्रोल झालीय

Devendra Jadhav

Saba Azad Video News: हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद सध्या चांगलीच चर्चेत आहे. सबा अनेकदा हृतिकसोबत हॉटेलमध्ये, इव्हेंट आणि पार्ट्यांना एकत्र दिसते. पण सबा सध्या चांगलीच ट्रोल झालेली दिसतेय.

हृतिकची गर्लफ्रेंड सबाने अलीकडेच लॅकमे फॅशन शोमध्ये हजेरी लावली होती. त्यानेळी सबाने केलेला डान्स आणि गाण्यामुळे ती चांगलीच ट्रोल झालीय.

सबाचा लॅकमे फॅशन शोमधला व्हिडीओ व्हायरल

सबाने लॅकमे फॅशन शोमध्ये हजेरी लावली. यावेळी रॅम्पवर डान्स केल्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. सबाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर लोकं खूप कमेंट करत आहेत.

सबा आझादने नुकतेच रॅम्प वॉक केले होते. जिथे ती चालण्याऐवजी नाचताना आणि गाताना दिसते. या कार्यक्रमात सबाने चमकदार पोशाख परिधान केला होता. व्हिडिओमध्ये सबाला पाहून असे दिसते की, ती या क्षणाचा पुरेपूर आनंद घेत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच तो व्हायरल होऊ लागला. परंतु सबाला मात्र लोकांनी ट्रोल केलंय

सबाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

सबा आझादचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओत सबा फॅशन शोमध्ये रँपवॉक करायचा सोडून डान्स आणि गायला लागते. फॅशन शोला उपस्थित असलेले लोकं सुद्धा तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात.

या व्हिडीओवर सध्या लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले -हिच्या अंगात आलंय का? तर दुसर्‍याने लिहिलं- ही नेमकी करतेय काय? याशिवाय एकाने लिहिले- ती काय करत आहे? मला वाटते की ती नशेत डान्स करतेय. काही लोकांनी मात्र सबाच्या बिनधास्त वागण्याचं कौतुक केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT