sai tamhankar dating bhau kadam comedy video in zee chitra gaurav award sakal
मनोरंजन

Sai Tamhankar: बॉयफ्रेंडचा फोटो दाखवताच सई ताम्हणकर लाजली.. निलेश साबळेने सगळंच सांगून टाकलं..

झी गौरव पुरस्कारात सई ताम्हणकरने दिली प्रेमाची कबुली..

नीलेश अडसूळ

Sai Tamhankar Video: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणुन सई ताम्हणकरचं नाव नेहमीच आघाडीवर असतं. ती नेहमीच वेगळेपणासाठी ओळखली जाते. तिनं मराठी मनोरंजनसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही धमाकेदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिकंली आहे.

आता ती केवळ मराठी पुरती सीमित राहिलेली नाही, ती हिंदीतही दमदार अभिनय करून सर्वांना चकित करत आहे. तिच्या मिमि या चित्रपटासाठी तिला नुकतचं सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरविण्यात आले होते.

सई ही अभिनयाबरोबरच सोशल मिडियावरही सक्रिय असते. ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. नेहमी काही ना काही पोस्ट करते. तिच्या चाहत्यांनाही तिच्याबद्दल जाणुन घेण्याची उत्सुकता असतेच.

गेल्या काही तिच्या अफेअरच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर झी चित्र गौरव सोहळ्यात एक दमदार बातमी सांगितली गेली.. ती एक अभिनेता सई ताम्हणकरच्या प्रेमात वेडा झाला आहे.

(sai tamhankar dating bhau kadam comedy video in zee chitra gaurav award)

नुकतंच एका कार्यक्रमात सईवर प्रेम असल्याची एका प्रसिद्ध कलाकाराने कबुली दिली आणि सई लाजून लाल झाली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

झाले असे की, येत्या रविवारी २६ मार्चला ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळा रंगणार आहे. या पुरस्कार सोहळ्याची थीम ‘चर्चा रंगणार बातमी गाजणार’ अशी आहे. नुकतंच सई ताम्हणकरचा एक व्हिडीओ ‘झी मराठी’ने शेअर केला आहे.

या व्हिडीओत निलेश साबळे हा सई ताम्हणकरबद्दलची एक बातमी सांगतो. तो म्हणतो, सई ताम्हणकरचं या अभिनेत्याबरोबर सुरु आहे रिलेशन.. हे ऐकून सई जरा घाबरतेच.. पण नंतर स्क्रीनवर सई आणि त्या अभिनेत्याचा फोटो दाखवण्यात येतो तर त्या मध्ये भाऊ कदमचा फोटो असतो.

भाऊचा फोटों पाहून सई लाजते आणि हसते. . यावेळी निलेश साबळे त्या दोघांचे आणखी काही फोटोही स्क्रीनवर दाखवतो आणि म्हणतो 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर झाली होती दोघांची मैत्री, भाऊने दिली आहे प्रेमाची कबुली... '

पुढे नीलेश म्हणतो, सई भाऊ सोबत त्याच्या चार मुलांचीही जबाबदारी घ्यायला तयार आहे. हे ऐकताच  सईला हसू अनावर होतं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif on Sunetra Pawar : सुनेत्रा पवार-प्रशांत किशोर भेटीवर हसन मुश्रीफांचं सूचक मौन; "मुंबईत काय घडलं माहिती नाही"

Bhira Hydroelectric Project : मुंबईच्या पाणीप्रश्नावर मोठा तोडगा! कोयना नव्हे, आता 'मुळशी'तून पश्चिमेकडे पाणी वळवण्याची मागणी; भिरा प्रकल्पातील 300 मेगावॉटमुळे होणार फायदा?

Gold Rate Today: बापरे! सोनं 84,000 हजारांनी महागलं; 4 दिवसांत मोठी वाढ; आता किती रुपयांना मिळतंय?

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवर हसन मुश्रीफ काय म्हणाले

Katraj Dairy Milk Price: कात्रज डेअरीच्या दूध दरात वाढ; दुग्धजन्य पदार्थही महागणार... किती पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT