salman khan
salman khan 
मनोरंजन

'त्याच्यासारखं कुणी नाही': गर्लफ्रेंडकडून सलमानचं तोंडभरून कौतूक

सकाळ डिजिटल टीम

Bollywood news : बॉलीवूडमधील भाईजान सलमान खान (Salman Khan) हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारा अभिनेता आहे. काही दिवसांपूर्वी सलमानचा अंतिम (Salman Khan movie) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये त्यानं प्रमुख भूमिका साकारली होती. मात्र तो काही फारसा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही. त्यानंतर बिग बॉसचा (Bigg Boss 15) होस्ट म्हणूनही सलमानला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली होती. आता तो त्याच्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आला आहे. त्याच्या युलिया वंतूर (iulia vantur) नावाच्या गर्लफ्रेंडनं त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. तिनं त्याचं तोंडभरून कौतूक केलं आहे. (Salman Khan news)

युलियानं म्हटलं आहे की, तो चांगला अभिनेता असण्यासोबतच सर्वोत्तम होस्टही आहे. त्याच्यासारखा अन्य कुणी नाहीच. गेल्या बारा वर्षांपासून सलमाननं बिग बॉसचं होस्टिंग केलं आहे. आणि ते मोठ्या यशस्वीपणे केले आहे. त्याच्या होस्टिंगचे चाहत्यांनी कौतूकही केलं आहे. यंदाच्या सीझनमध्ये देखील त्यानं चाहत्यांची पसंती मिळवली होती. बिग बॉसचा चौथा सीझन सलमाननं होस्ट केला होता. तेव्हापासून ते आतापर्यतचा सलमानची होस्टिंग जर्नी भन्नाट असल्याचे युलियानं म्हटलं आहे.

भाईजानची जवळची मैत्रीण आणि गर्लफ्रेंड असल्याचे चर्चा असणारी युलिया ही गायिकाही आहे. युलियाची ओळख सलमानमुळे असल्याचे सांगितले जाते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या अफेयरवरुन त्यांचे नाव नेहमीच चर्चेत असले तरी त्यांनी एकमेकांना कायमच एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे म्हटले आहे. युलिया काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये सलमान सोबत दिसली होती. यावेळी ती तिचं मै चला नावाच्या गाण्याचे प्रमोशन तिनं केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT