Salman Khan  sakal media
मनोरंजन

Bandra: सलमान खान ड्युप्लेक्स फ्लॅटसाठी महिन्याला मोजतोय लाखोंचं भाडं

सलमानकडून ११ महिन्यांसाठी करार निश्चित

स्वाती वेमूल

सलमानकडून ११ महिन्यांसाठी करार निश्चित

बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात अभिनेता सलमान खान Salman Khan मुंबईतील वांद्रे परिसरातील 'गॅलेक्सी अपार्टमेंट'मध्ये कुटुंबीयांसोबत राहतो. याच घराजवळ सलमानने दुमजली फ्लॅट भाडेतत्त्वावर घेतलं आहे. रिअल इस्टेट पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खान वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून भाडे करार निश्चित करण्यात आला आहे. वांद्रे इथल्या मक्बा हाइट्स या इमारतीमधील १७ आणि १८व्या मजल्यावरील हे फ्लॅट्स आहेत. बाबा सिद्दिकी आणि झिशान सिद्दिकी हे या फ्लॅट्सचे मालक आहेत. सलमानकडून ११ महिन्यांसाठी हा करार करण्यात आला असून हा दुमजली फ्लॅट २,२६५ चौरस फुटांवर पसरलेला आहे. भाड्याने घेतलेला हा दुमजली फ्लॅट सलमान खानच्या कंपनीसाठी काम करणाऱ्या लेखकांसाठी वापरला जाईल.

सलमानने नुकत्याच त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'अंतिम- द फायनल ट्रुथ' हा चित्रपट येत्या २६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सलमान पोलिसाच्या भूमिकेत आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित 'मुळशी पॅटर्न' या मराठी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे.

'अंतिम' या चित्रपटासोबतच सलमान 'टायगर ३'मध्येही झळकणार आहे. यामध्ये कतरिना कैफ त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मनिष शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटातही त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. याशिवाय 'कभी ईद कभी दिवाली' आणि 'किक २' हे दोन चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

Sunetra Pawar: यशवंत विचारांनीच कायम वाटचाल करणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कऱ्हाडला बाळासाहेब पाटील यांना काय म्हणाल्या?

मोठी बातमी! उजनी धरणातून शेतीसाठी २० मार्चनंतर सुटणार सलग ८० दिवस पाणी; कालवा सल्लागार समितीची पुढील आठवड्यात बैठक, वाचा...

आजचे राशिभविष्य - 13 मार्च 2026

मूत्रपिंड व मूतखडा

SCROLL FOR NEXT