palak tiwari Sakal
मनोरंजन

Palak Tiwari: सलमान खानने सेटवर छोटे कपडे घालणाऱ्या मुलींसाठी बनवला होता अनोखा नियम; पलक तिवारीचा मोठा खुलासा

सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

Aishwarya Musale

अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते, तर आता तिची लाडकी मुलगी पलक तिवारीनेही तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. पलट तिवारी लवकरच सुपरस्टार सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. सध्या ती सलमानसोबत चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे.

चित्रपटाची अनेक गाणी आणि ट्रेलर रिलीज झाले आहेत. पलक तिवारीला भाईजानसोबत पडद्यावर पाहून तिचे चाहते खूप खूश आहेत. ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

या चित्रपटापूर्वीही पलकने सलमान खानच्या अंतिम या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. याचा खुलासा खुद्द सलमानने ट्रेलर लाँचदरम्यान केला होता. सलमानच्या या खुलाशानंतर आता पलकनेही चित्रपटाच्या सेटशी संबंधित एक खुलासा केला आहे.

पलक तिवारीच्या म्हणण्यानुसार, अंतिम चित्रपटादरम्यान सलमान खानने सेटवर काम करणाऱ्या मुलींसाठी काही नियम ठेवले होते. त्यानुसार सेटवरील सर्व मुलींना पूर्ण कपडे घालून काम करावे लागले. डीप नेकलाइन असलेले कपडे घालण्यास मनाई होती.

पलकने तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सलमानने सर्व मुलींना सेटवर अंगभर कपडे परिधान करून येण्यास सांगितलं होतं. सेटवर मुलींच्या सुरक्षेसाठी सलमानने विशेष काळजी घेतली होती, असंही पलकने सांगितलं.

‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, भूमिका चावला, व्यंकटेश डग्गुबती, जगपती बाबू, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल यांच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

Pune News : गणेशोत्सवात गुन्हेगारीला ‘नो एन्ट्री’ ! पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा सराईत गुन्हेगारांना इशारा

SCROLL FOR NEXT