Salman Arpita 
मनोरंजन

बहिणी अर्पिता, अलविरा होते कोव्हिड पॉझिटिव्ह- सलमान खान

अर्पिताने सोशल मीडियावर पोस्ट लिहित दिलं स्पष्टीकरण

स्वाती वेमूल

बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात अभिनेता सलमान खानच्या Salman Khan बहिणी अर्पिता खान शर्मा Arpita Khan Sharma आणि अलविरा अग्निहोत्री Alvira Agnihotri यांना कोरोनाची लागण झाली होती. 'राधे' या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या मुलाखतीत सलमानने याचा खुलासा केला. या दोघींनाही कोरोनाची कोणतीच लक्षणे नव्हती आणि त्यांनी यशस्वीरित्या त्यावर मात केली, असंही त्याने सांगितलं. कोरोनाची दुसरी लाट ही आणखी धोकादायक असल्याचं मत त्याने यावेळी मांडलं. (Salman Khan reveals sisters Arpita and alvira tested positive for Covid 19)

सलमान म्हणाला, "माझ्या बहिणी अलविरा आणि अर्पिता या दोघींचा कोव्हिड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. कोरोनाची दुसरी लाट ही अधिक धोकादायक आहे. यावेळी आमच्या कुटुंबातच कोरोनाचा शिरकाव झाला. गेल्या वेळी आमच्या ड्राइव्हर्सनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र यंदा विषाणूची लागण होण्याचा धोका अधिक वाढला आहे."

हेही वाचा : अभिनवने श्वेताकडून बळजबरीने मुलाला घेतलं हिसकावून; घटना सीसीटीव्हीत कैद

सलमानच्या या मुलाखतीनंतर त्याची बहीण अर्पिताने सोशल मीडियावर पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिलं. 'एपिल महिन्याच्या सुरुवातीला मला कोरोनाची लागण झाली होती. पण मला कोणतीच लक्षणे नव्हती. मी सर्व नियमांचं पालन केलं आणि देवाच्या कृपेने त्यातून बरी झाली. तुम्हीसुद्धा सुरक्षित राहा आणि काळजी घ्या', अशी पोस्ट अर्पिताने लिहिली.

कोरोना काळात सलमानकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. गेल्या महिन्यात त्याने मुंबईतील ५००० फ्रंटलाइन वर्कर्ससाठी जेवणाची सोय केली होती. त्यानंतर आता तो २५ ते ५० हजार सिने वर्कर्ससाठी औषधं आणि जेवणाची सोय करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT