salman khan, salman khan troll, salman khan pathaan
salman khan, salman khan troll, salman khan pathaan  SAKAL
मनोरंजन

Salman Khan Trolled: प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या उशिरा, सलमान झाला ट्रोल

Devendra Jadhav

Salman Khan Troll : सुपरस्टार सलमान खान किसी का भाई किसी का जान सिनेमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानचं फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. पण काल २६ जानेवारीला घडलेल्या एका गोष्टीवरून भाईजानला लोकांनी चांगलंच फैलावर घेतलं आहे. त्यामुळे सलमान खानला पळता भुई थोडी झाली आहे.

झालं असं कि.. काल २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन होता. त्यानिमित्ताने भाईजानने ट्विटरवर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आता शुभेच्छा देण्यात भाईजानची भावना चांगली होती पण टायमिंग चुकला. सलमान खानने संध्याकाळी ५ वाजून १६ मिनिटांनी ट्विटरवर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याच गोष्टीवरून नेटकऱ्यांनी सलमान खानची चांगलीच शाळा घेतली आहे.

'सकाळी कुठे होता भावा.... जय हिंद'', भाई इतनी जल्दी', 'भाईजानची सकाळ आता झाली', 'तुला आता आठवण आली' अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी सलमान भाईची चांगलीच शाळा घेतली. सिनेमात भाईची एंट्री परफेक्ट टायमिंग वर होत असली तरीही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना भाईजानचा टायमिंग चुकलाच.

सलमान खानचा आगामी सिनेमा असणार आहे किसी का भाई किसी कि जान.. २०२३ च्या ईद मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. सलमान खानचा डॅशिंग अंदाज किसी का भाई किसी कि जान सिनेमात पाहायला मिळतोय. शाहरुखच्या पठाण सोबत किसी का भाई किसी कि जान चा ट्रेलर रिलीज झाला. पूजा हेगडे सलमान खान सोबत हिरोईन म्हणून झळकणार आहे.

सलमान खान नुकताच शाहरुखच्या पठाण सिनेमात झळकला. पठाण निमित्ताने यशराज फिल्मस स्पाय युनिव्हर्स तयार करत आहे. पठाण मध्ये टायगर म्हणजेच सलमान खानची एंट्री झाली. लवकरच सलमान - शाहरुख सोबत वॉर फेम अभिनेता हृतिक रोशन सुद्धा सहभागी होणार आहे.

अशाप्रकारे सलमान - शाहरुख - हृतिक या तिघांचं मिळून स्पाय युनिव्हर्स तयार होणार आहे. पठाण नंतर सलमानच्या आगामी टायगर ३ सिनेमात शाहरुख आणि हृतिक एकत्र दिसण्याची शक्यता आहे.पठाण सिनेमात सलमानची छोटीशी एंट्री चांगलीच भाव खाऊन गेली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT