Salman Khan upgrades to bulletproof Toyota Land Cruiser Google
मनोरंजन

Salman Khan ची कार झाली बुलेटप्रुफ, सुरक्षेच्या कारणास्तव उचललं मोठं पाऊल

गॅंगस्टर बिश्नोईच नाही तर आणखी एक शार्प शूटर सलमानला मारण्यासाठी मुंबईत आला होता अशी खबर पोलिसांना मिळाल्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ झाली आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेता सलमान खानला(Salman Khan) अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. सलमान खानला पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या करणारा आरोपी गॅंगस्टर बिश्नोईनं जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं की, आणखी एक शार्प शूटर सलमानची हत्या करण्यासाठी मुंबईत पोहोचला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली होती.(Salman Khan upgrades to bulletproof Toyota Land Cruiser)

काही दिवसांपूर्वी सलमान खानचे वडील सलीम खान यांना आणखी एक धमकी देणारं पत्र मिळालं. यानंतर सलमान खानने मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती. आणि त्याच भेटीत सलमानला लायसन्स असेली बंदूक जवळ बाळगण्याची परवानगी द्यावी यावर विचार झाला होता. आता बातमी आहे की सलमान खानने आपली सुरक्षा वाढवण्यासोबतच आपली गाडी सुद्धा अपग्रेड करुन घेतली आहे. सलमान खान आता पांढऱ्या रंगाच्या बुलेटप्रूफ लॅंड क्रुझरमधून प्रवास करु लागला आहे. आणि त्याच्यासोबत बंदूकधारी सुरक्षारक्षकांचा मोठा ताफाही पहायला मिळत आहे. याआधी सलमान खान लॅंड रोव्हरमधून प्रवास करायचा.

सलमान खानवर आरोप आहे की, त्यानं राजस्थानच्या जोधपूरमध्ये काळ्या हरणाची शिकार केली होती. काळ्या हरणाला राजस्थानमधील बिश्नोई समाजात पवित्र स्थान आहे. यानंतरच गॅंगस्टार लॉरेन्स बिश्नोईने बिश्नोई समाजाच्या सम्मानाचा मुद्दा उचलत सलमान खानला मारुन टाकण्याची धमकी दिली होती.

सलमान खानच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर तो आता 'टायगर ३' सिनेमात कतरिना कैफ आणि इमराम हाश्मिसोबत दिसणार आहे. या व्यतिरिक्त सलमान 'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमाच्या शूटिंगमध्ये देखील व्यस्त आहे. या सिनेमात त्याच्यासोबत पूजा हेगडे दिसणार आहे. बातमी अशी देखील आहे की लवकरच सलमान 'नो एंट्री'च्या सीक्वेलमध्ये देखील दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada House Lottery: म्हाडा 'त्या' विजेत्यांची पुन्हा लॉटरी काढणार! कारण आलं समोर

Wakad Sangvi News : 'झाडू' हाती घेत डॉक्टरांनी केली स्वच्छता; सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई नसल्याने वैद्यकीय अधिकारीच सफाईत

Graduate Constituency Election : खडकवासला मतदार संघात शिक्षक, पदवीधर मतदार नोंदणीला सुरुवात; डॉ. माने यांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा सकल हिंदू समाजाकडून आरोप

बाबो 150 कोटींची जाहिरात ! अ‍ॅटलीच्या दिग्दर्शनाखाली रणवीर सिंग, श्रीलीला आणि बॉबी देओल एकत्र

SCROLL FOR NEXT