Tiger 3 new promo आेोकोत
मनोरंजन

Tiger 3 New Promo: सलमानच्या टायगरचा दरारा असा की सेन्सॉर बोर्डाकडून झिरो कट्स! नवीन प्रोमोही आला भेटीला

Vaishali Patil

Tiger 3 New Promo: सलमान खान आणि कतरिना कैफचा 'टायगर 3' हा चित्रपट हा यावर्षीचा बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. दोघांचे चाहते या चित्रपटासाठी खुपच उत्सुक आहेत. 'टायगर 3' चित्रपट आता रिलिजसाठी सज्ज झाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर टायगर 3 चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

आता टायगर 3च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमानच्या या अ‍ॅक्शन चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडूनही परवानगी मिळाली आहे. त्याचबरोबर CBFC कडून या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. महत्वाचं म्हणजे 'टायगर 3'ला CBFC ने झिरो कटसह मंजुरी दिली आहे.

यावेळी कोणताही सीन काढण्यात आलेला नाही मात्र काही शब्दात बदल करण्यात आले आहेत. 'बेवकूफ', 'मशरूफ', 'मूर्ख', 'व्यस्त' असे काही शब्द काढण्यात आलेले आहे. त्याबरोबर चित्रपटात जिथे RAW अशा उल्लेख करण्यात आला आहे तिथे निर्मात्यांना R&AW करण्यास सांगितले आहे. यासोबत आता चित्रपटाला U/A प्रमाणपत्र देण्यात आले. हा सिनेमा 2 तास 22 मिनिटांचा आहे.

तर दुसरीकडे चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांनाही एक सरप्राइज दिलं आहे. निर्मात्यांनी "टायगर 3" चा दुसरा प्रोमो शेयर केला आहे. या प्रोमोमध्ये सलमानसोबतच कतरिनाचा अ‍ॅक्शन सीनसोबत इम्रार हाश्मी देखील आपल्या अभिनयाची छाप सोडताना दिसत आहे.

सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीशिवाय या चित्रपटात शाहरुख खान देखील दिसणार आहे. 'टायगर' फ्रँचायझीचा हा तिसरा भाग आहे. हा चित्रपट 12 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे शो सकाळी 7 वाजल्यापासून सुरु होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

Monday Morning Breakfast Recipe: ना लसूण, ना कांदा घरच्या घरी झटपट बनवा व्हेगन कबाब, सोपी आहे रेसिपी

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

SCROLL FOR NEXT