Booby Deol With Salman Khan Google
मनोरंजन

'सलमान माझ्यासाठी देवदूत';बॉबी देओल असं का म्हणाला?

अभिनेत्याने त्याच्या 'आश्रम' या वेबसिरीजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार पदार्पण केलं आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेता बॉबी देओलचा(Bobby Deol) आज वाढदिवस आहे. बॉबी देओलने बरसात या सिनेमामधनं बॉलीवूडमध्ये दमदार एन्ट्री केली होती. पण तुम्हाला माहित आहे का खऱंतर बॉबीनं त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून 'धर्मवीर' या सिनेमातून केली आहे.. त्याला 'बरसात' या सिनेमासाठी फिल्मफेअरचा 'बेस्ट डेब्यू' अॅवॉर्ड मिळाला होता. त्यानंतर सोल्जर,बादल,बिच्छू,हमराज आणि अजनबी असे कितीतरी हिट सिनेमे त्याच्या नावावर आहेत. पण त्यानंतर त्याला काम मिळणं बंद झालं. तो त्याच्या करिअरचा सर्वात वाईट काळ होता. एकदा एका मुलाखतीत त्यानं सलमानचे(Salman Khan) आभार मानत त्याच्यामुळे आपलं करिअर वाचलं अशी कबुली दिली होती.

Bobby Deol

सलामान खानविषयी बोलताना तो म्हणाला होता,''मी निर्मात्यांना भेटणं सुरू केलं होतं. त्यांना मी कामाला घेऊन किती गंभीर आहे,मला कामाची किती गरज आहे याविषयी पटवून देण्यात यशस्वी झालो. तेव्हा सलमान मला म्हणाला की त्याच्या करिअरच्या वाईट काळात त्यानं माझा मोठा भाऊ सनी देओल आणि संजय दत्तचा आधार घेतला होता. त्यांच्यासोबत काम करून त्यानं स्वतःला कसं तारलं होतं याचा अनुभव मला सांगितला. तसंच तो मला म्हणाला,''तू सुद्धा दुसऱ्या कलाकारांसोबत काम करायला सुरुवात कर''. बॉबी ने सलमानच्या या सल्ल्याला गंभीरतेनं घेतलं आणि सलमानला म्हणाला,''चल आता तूच माझी मदत कर''.

Bobby Deol with his wife Tanya Deol

त्याचवेळी निराशेच्या गर्तेत सापडलेल्या बॉबीला सलमानने 'रेस ३' मध्ये ब्रेक दिला. आणि त्यानंतर बॉबीचं करिअर हळूहळू वळणावर येऊ लागलं. त्यानंतर आलेल्या बॉबीच्या 'आश्रम' या वेबसिरीजने पुन्हा त्याच्या नावावर एका हिटची नोंद केली. या सिरीजचाय दुसरा भागही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि आता सर्वजण वाट पाहत आहेत ते 'आश्रम भाग ३' कधी येतोय याची. आपल्या कठीण काळात आपल्या पत्नीनंही आपल्याला खूप आधार दिला असं बाबाीनं आवर्जुन नमूद केलं आहे. बॉबी एक अभिनेता तर आहेच पण त्याचसोबत तो बिझनेसमन सुद्धा आहे. मुंबईत त्याचे दोन चायनिज रेस्टॉरंट आहेत. त्याची पत्नीही इंटेरिअर डिझायनरचा व्यवसाय करते. आज त्याच्या वाढदिवसानिमित्तानं 'ईसकाळ' कडून त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT