Pop icon Samantha Fox has been arrested
Pop icon Samantha Fox has been arrested esakal
मनोरंजन

Samantha Fox : समंथा विमानातच करत होती नशापाणी, पोलिसांनी केली अटक! चाहत्यांना मोठा धक्का

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Pop icon Samantha Fox has been arrested: पॉप आयकॉन समंथा फॉक्ससंबंधी(Samantha Fox Latest News) एक मोठी बातमी समोर आली आहे. तिला लंडनच्या विमानतळावर नशेच्या अवस्थेत पोलिसांनी पकडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का (Viral News) बसला आहे. पोलिसांनी तिला अटकही केली आहे.

१९८० च्या दशकांतील प्रमुख गायिका समंथा फॉक्सला पोलिसांनी अटक (Samantha Fox Arrested) केल्याचे दिसून आले आहे. तिला लंडनच्या हिथ्रो विमानतळावर अटक करण्यात आली असून सोशल मीडियावर तिच्याविषयीची ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. समंथा विमानतच नशापाणी करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता.

सहप्रवाशासोबत झाला वाद...

लंडनवरुन म्युनिकला जाणाऱ्या समंथा फॉक्सचा दुसऱ्या एका सहप्रवाशासोबत भांडणं झाल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर तिला विमानातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे विमान उड्डाणास उशीर होत होता. मात्र त्याचे समंथाला काही देणे घेणे नव्हते. तिनं नशापाणी केल्याचे दिसून आल्यानं त्या पॉप गायिकेला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

या सगळ्यात संबंधित विमान यंत्रणेनं प्रवाशांची माफी मागितली आहे. त्यांनी प्रवाशांना जो त्रास झाला आहे त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. प्रवाशांचा वेळ वाया गेल्यानं त्यांना एका हॉटेलमध्ये थांबविण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा यात्रा सुरु करण्यात आली.

पोलिसांनी केली कारवाई....

समंथा फॉक्स ही ब्रिटिश एयरवेजद्वारे प्रवास करताना तिची आणि आणखी एका सहप्रवाशाशी भांडण झालं. त्यांच्यात झालेल्या भांडणाचा इतर सहप्रवाशांना त्रास झाला. या सगळ्यात विमानाला उड्डाण करण्यास उशीर होत असल्याचे सांगण्यात आले. विमान पुन्हा रनवे वर आणण्यात आले. या सगळ्यात ५० वर्षीय एक महिला तिची ओळख फॉक्सच्या रुपात समोर आली. त्या महिलेनं नशापाणी केल्याचा आरोप पोलिसांनी तिच्यावर केला. त्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता संघात 7-7 ओव्हरचा सामना; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT