Samantha Ruth Prabhu Esakal
मनोरंजन

Samantha चा 'शाकुंतलम' तोंडावर आपटला.. अभिनेत्रीच्या स्टारडमपुढे शोभेना कमाईचा आकडा.. वाचा

'शाकुंतलम'चं अपयश पाहून साऊथच्या एका निर्मात्यानं थेट समंथाचं करिअर संपल्याची तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

प्रणाली मोरे

Samantha Ruth Prabhuचा 'शाकुंतलम' सिनेमा बड्या सिनेमांपैकी एक होता, पण बॉक्स ऑफिसवर मात्र पूर्णपणे अपयशी ठरला आहे. बोललं जात आहे की या सिनेमानं आतापर्यंत केवळ ७ करोडची कमाई केली आहे. आणि या नुकसानीचा भुर्दंड निर्मात्यांना सोसावा लागणार आहे.

तेलुगु सिनेमा डॉट कॉम च्या रिपोर्टनुसार,'शाकुंतलम' सिनेमाचं बजेट ६० कोटी इतकं होतं. या सिनेमाच्या रिलीजआधीच ३५ करोडमध्ये निर्मात्यांनी सिनेमाचं ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत डील केलं होतं.

एका न्यूज पोर्टलनं दावा केला आहे की निर्माता दिल राजू सॅटेलाईट कंपन्यांकडून १५ करोड मागत होते. पण हे शक्य झालं नाही. आणि याचा परिणाम म्हणजे 'शाकुंतलम' चे दोन्ही निर्माते दिल राजू आणि गुनशेखर यांना मिळून आता सिनेमासाठी जवळपास २० करोडचं नुकसान सोसावं लागेल. (Samantha Ruth Prabhu shaakuntalam first week boxoffice collection)

गुनशेखर लिखित आणि दिग्दर्शित 'शाकुंतलम' एक पौराणिक सिनेमा आहे,जो शकुंतला संबंधित लोककथेवर आधारित आहे. समंथा व्यतिरिक्त यामध्ये देवमोहननं देखील मध्यवर्ती भूमिकेत काम केलं आहे.

दोन गोष्टी 'शाकुंतलम' मध्ये फसलेल्या वाटल्या त्या म्हणजे सिनेमातील संवाद आणि व्हीएफएक्स. सिनेमा हिंदीत पाहणाऱ्यांना संवाद खूपच पुस्तकी वाटतायत अशा प्रतिक्रिया समोर आल्यात.

टी.व्हीवर 'रामायण' आणि 'महाभारत' सारख्या मालिका आवडीनं पाहणाऱ्या लोकांचा 'शाकुंतलम'नं भ्रमनिरास केल्याचं समोर आलं आहे. बड्या बड्या सीन्सच्या माध्यमातून सिनेमाला दिग्दर्शित करण्याचा प्रयत्न केला गेला पण त्यातील उठावदारपणा फार कमी वेळा दिसून आला. सिनेमा ३ डी मध्ये होता पण दोन ते तीन सीन सोडले तर सिनेमाला ३ डी ची आवश्यकता नव्हती असं बोललं जात आहे.

यादरम्यान,बॉक्सऑफिसवर शाकुंतलमला मिळालेल्या अपयशाला पाहून अनुभवी तेलुगु निर्माता-दिग्दर्शक चिट्टीबाबूनं यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे, सिनेमातील लूक्सवरनं त्यानं समंथाची खिल्ली उडवली आहे आणि दावा केला आहे की समंथाचं 'स्टार हिरोईन' हे पद आता जवळजवळ गेल्यात जमा आहे. तिचं करिअर संपलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT