Samantha Ruth Prabhu  Instagram
मनोरंजन

Video: समंथा चक्क एअरपोर्टवर नाचली अन् व्हायरल झाली

अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांचं मनोरंजन करताना पहायला मिळते.

प्रणाली मोरे

टॉलीवूडची स्टार अभिनेत्री समंथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu) ही उत्तम डान्सर आहे हे आपण सर्वांनींच तिला 'पुष्पा-द राईज'(Pushpa-The Rise) या सिनेमात जेव्हा 'ऊ-अंटावा' या गाण्यावर थिरकताना पाहिलं असेल तेव्हा लक्षात आलंच असेल. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय पहायला मिळते,तिनं सध्या तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. आणि याची सोशल मीडियावर भलतीच चर्चा होतेय. तिचे चाहते तर तिच्या या व्हिडीओवर खूप खूश झालेले दिसून आले आहे.

त्याचं झालं असं की शूटिंगच्या निमित्तानं समंथा रात्री उशिराची फ्लाइट पकडण्यासाठी एअरपोर्टवर आली आणि मग काय तिनं नेहमीप्रमाणे तिची रॉकिंग स्टाईल दाखवली आपल्या व्हिडीओतनं. तिनं पोस्ट केलेल्या त्या व्हिडीओत ती एअरपोर्टवर आपण जेव्हा बोर्डिंग करतो आणि फ्लाइटमध्ये बसण्यासाठी आत जातो,तिथे एक वॉकिंग स्ट्रीट असते काही अंतराची. त्या वॉकिंग स्ट्रीटवर समंथा भन्नाट अरेबिक स्टाईलचा डान्स करताना दिसतेय. ज्या गाण्यावर ती नाचतेय ते गाणं थलापथ्थी विजय आणि पूजा हेगडे यांच्यावर चित्रित झालेलं दक्षिणेकडील सिनेमातलं एक सुपरहीट गाणं आहे. गाण्याचे बोल काहीसे कानावर पडले आणि थोडेफार कळाले ते असे आहेत,'हलामिथि हबिबो'...हा व्हिडीओ पोस्ट करत संमथानं कॅप्शन दिलं आहे की,''Just another late night flight..Not!''आणि HalamithiHabibo हे हॅशटॅग तिनं दिलं आहे. तिच्या या व्हिडीओवर मात्र 'लेट्स रॉक सॅम','टू क्यूट','फायर इमोजी' अशा विविध प्रतिक्रिया चाहत्यांनी दिलेल्या पहायला मिळत आहेत.

समंथा नुकतीच आपल्याला 'पुष्पा-द राइज' मध्ये 'ऊ अंटावा' गाण्यावर अल्लू अर्जूनसोबत थिरकताना दिसली होती. या गाण्यातील तिचा डान्स,तिच्या अदा यांनी प्रेक्षकवर्ग तिच्यावर भलताच भाळला होता. समंथा काही दिवसांपूर्वीपासून चर्चेत आली ती नागाचैतन्य पासून तिनं घटस्फोट घेतल्याचे जाहिर केल्यानंतर. त्यांच्या विभक्त होण्यानंतर खूप वादातीत चर्चा रंगल्या खऱ्या, पण समंथानं त्या सगळ्या चर्चांना आपल्या उत्तरानं शांत केलं. आता आपल्या आयुष्यात पुढे जाणारी समंथा सिंगल लाईफ एन्जॉय करतेय. तिचं ते एन्जॉय करणं असं सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी ट्रीट असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

Wholesale Inflation India : घाऊक महागाईचा दर वाढला! 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आकडेवारी, सामान्य जनतेला फटका

बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांचा डंका ! तीन दिवसात तिन्ही सिनेमांनी केलेलं कलेक्शन घ्या जाणून

अ‍ॅडव्हान्स कर भरलात का? आज शेवटची तारीख, न भरल्यास होईल दंड

SCROLL FOR NEXT