
माधुरी दिक्षित-नेने (Madhuri Dixit-Nene) म्हणजे बॉलीवूडला(Bollywood) मिळालेलं निखळ हास्य,मोहक सौंदर्य आणि सहज अभिनयाची देणगी म्हणावी लागेल. गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाच्या,नृत्याच्या माध्यमातून तिनं प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. आता ती सज्ज झालीय नव्या डिजिटल विश्वात एक यशस्वी इनिंग खेळण्यासाठी. तिची नवीन 'द फेम गेम'(The Fame Game) ही सिरीज आपल्या भेटीस येत आहे,ज्यात ती महत्त्वाची मु्ख्य भूमिका साकारत आहे. या वेबसिरीजच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत माधुरीनं महिलाप्रधान सिनेमांना घेऊन मोठं वक्तव्य केलं आहे. काय म्हणालीय माधुरी? वाचा सविस्तर.
महिलाप्रधान सिनेमे म्हणजे केवळ सोशिक अथवा बदला घेणारी स्त्री असं समीकरण आता संपलंय. आता या सिनेमातही स्त्रीच्या कैक छटा आपण पाहतो. असं विधान केलंय ते थेट माधुरी दिक्षितनं. तिनं महिलाप्रधान सिनेमांविषयी असलेला चुकीचा समज खोडून काढला आहे. माधुरीनं १९८४ मध्ये 'अबोध' सिनेमापासून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. ती म्हणालीय,''त्या वेळेला फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील असे निर्माते-दिग्दर्शक होते जे महिलाप्रधान सिनेमे बनवत होते. अर्थात महिलांना मध्यवर्ती ठेवून सिनेमा लिहिणारे लेखकही तुरळक होते. पण आता २०२२ मध्ये खूप मोठा बदल यात आला आहे. आता जमाना महिलाप्रधान सिनेमांचा आहे,आणि हा खरंच चांगला बदल आहे. आज जर आपण आजच्या महिलाप्रधान सिनेमांविषयी बोललो तर ते केवळ स्त्री कशी सोशीक आहे किंवा कसा बदला घेते यासंदर्भात भाष्य करणारे नसतात तर आता स्त्री खूप वेगवेगळ्या पद्धतीनं सिनेमातनं दाखवली जाते. आज प्रत्यक्षात जशी स्त्री आहे वेगवेगळ्या माध्यामातून, तशी ती सिनेमातही दाखवली जाते. केवळ एकाच अॅंगलमधून तिच्याकडे पाहिलं जात नाही ही स्वागतार्ह बाब आहे. ती कामाला जाणारी असते,कधी ती हाऊस वाईफ असते,तर कधी वेगवेगळ्या प्रोफेशनमधली असते,कधी ती खेळात प्राविण्य मिळवणारीही दाखवली जाते....इतक्या वेगवेगळ्या छटा स्त्रीच्या दाखवल्या जातात. आणि म्हणूनच त्या पडद्यावर साकारण्याचा आनंद काही औरच असतो असंही माधुरीनं त्या मुलाखतीत नमूद केलं. तिनं यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचं भरभरून कौतूक केलं आहे. महिलाप्रधान सिनेमांना प्राधान्य देण्याचं काम डिजिटलनं केलंय असंही ती म्हणाली. लोकांच्या भावविश्वाचा ठाव घेत डिजिटलचे विषय हाताळले जात आहेत. कधी तिथे खूपच विदारकही पहायला मिळतं. पण अनेकदा ते समाजात घडतानाही आपण पाहतोच की. हा एक मोठा बदल म्हणावा लागेल''.
माधुरी पुढे म्हणाली,''मी पाहतेय की वर्षागणिक सिनेमातनं बनत आलेली स्त्रीची इमेज आता या अलिकडच्या सिनेमात बदलताना दिसतेय. लेखक मेहनत घेत आहेत समाजात वेगवेगळ्या स्तरातील स्त्री व्यक्तिरेखांना प्रत्यक्षात कसं दाखवता येईल यासाठी. आणि त्यामुळेच महिलाप्रधान सिनेमातील स्त्री पात्र आता अधिक आश्वासक वाटू लागली आहेत. पडद्यावरच काय, पडद्यामागे देखील वेगवेगळ्या भूमिका साकारताना स्त्रीया जेव्हा मी पाहते तेव्हा मला हा बदल खूप सुखावह वाटतो. पूर्वी मी सिनेमाच्या सेटवर जायचे तेव्हा कलाकार आणि हेअरड्रेसर सोडले तर महिला कुणी नसायच्या पण आता कॅमेरादेखील स्त्रीया हाताळतात,लाइटिंग सेट करतात,मेकअप करतात इतकंच काय दिग्दर्शनही करतायत ...म्हणजे पुरुषांची मक्तेदारी असलेली क्षेत्र स्त्रियांनी काबीज केलीयत हा मोठा बदल म्हणावा लागेल''. 'द फेम गेम' या माधुरीच्या वेबसिरीजमध्ये देखील ती अनामिका आनंद या सुपरस्टारची भूमिका करत आहे. जिथे तिच्या ग्लॅमरच्या आड अनेक गुपितं दडलेली असतात....असं एकंदरीत कथानक पहायला मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.