Sanjay Datt reveals that he was taking drugs to loook cool towards women
Sanjay Datt reveals that he was taking drugs to loook cool towards women esakal
मनोरंजन

महिलांसमोर 'कूल' दिसण्यासाठी घेत होतो ड्रग्ज - संजय दत्त

सकाळ ऑनलाईन टीम

बॉलीवूड अभिनेता संजय दत्तने एका मुलाखतीत त्याच्या जुन्या दिवसांची आठवण काढत काही जुन्या दिवसांचे किस्से सांगीतले आहे.जेव्हा तो व्यसनमुक्ती केंद्रातून परतला तेव्हा लोक त्याला 'चरसी (जंकी)' म्हणायचे.KGF Chapter 2 च्या ट्रेलर लाँचच्या वेळी पत्रकार परिषदेदरम्यान जेव्हा संजय दत्तला विचारण्यात आले की,मुन्नाभाई च्या भूमिकेसाठी जेवढे प्रेम आणि प्रशंसा संजयला प्रेक्षकांकडूलन मिळाले होते तेवढेच प्रेम KGF-२ मधील खलनायकाच्या भूमिकेसाठी मिळेल काय ?की याउलट तुमचा तीरस्कार केला जाईल?तेव्हा संजयने या प्रश्नाचे अगदी विनोदी उत्तर दिले.तो म्हणाला की अधीरालाही मुन्नाईतकेच प्रेम दिले जाईल.

संजय दत्तचा इतिहास प्रेक्षकांपासून काही लपलेला नाहीच.(SANJU MOVIE)संजू चित्रपटातून जेथे त्याचा भूतकाळ प्रेक्षकांपुढे मांडला गेला तेथे दुसरीकडे त्याचा अंमली पदार्थांच्या वापराचा इतिहासही प्रेक्षकांना ठाऊक होता.(SANJAY DATT)संजयला जाताना बघून अनेकजण त्याला 'चरसी (जंकी)' म्हणायचे.अलीकडेच एका मुलाखतीत अभिनेत्याने खुलासा केला होता की तो महिलांपुढे कूल दिसण्यासाठी ड्रग्स घेतो.रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत संजय दत्त म्हणाला,की तो ड्रग्स करतो कारण त्याला वाटतं त्यामुळे तो मस्त दिसतो. तो म्हणाला की तो खूप लाजाळू होता.विशेषत: महिलांबद्दल, म्हणून मी हे छान दिसण्यासाठी सुरू केले. तुम्हीही हे करा म्हणजे स्त्रीयांसमोर कूल दिसाल,असे विनोदी उत्तर त्याने मुलाखतीत दिले होते.

खरं तर संजयला कोणी चरसी म्हणावं हे अपेक्षित नव्हतंच आणि त्याचे त्याला वाईटही वाटायचे. हे चुकीचे आहे,यावर काही तरी तोडगा काढायला हवा असा विचार त्याने केला आणि म्हणून त्याने वर्कआऊट करायला सुरुवात केली. त्यानं नंतर तो चरसीमधून 'स्वॅग' आणि 'क्या बॉडी है' असलेला माणूस बनला असे तो म्हणाला.

संजयने लॉकडाऊन मध्ये कॅन्सर वर कशी मत केली तेही त्याने मुलाखती दरम्यान उघड केले.पुढे तो म्हणतो,'तो म्हणाला: “लॉकडाऊनमधला तो सामान्य दिवस होता.मी पायऱ्या चढून वर गेलो तेव्हा माझा श्वास सुटला होता.मला श्वास घेता येत नव्हता, मला काय होत आहे हे कळत नव्हते,म्हणून मी माझ्या डॉक्टरांना फोन केला.डॉक्टरांनी जेव्हा एक्सरे काढले तेव्हा माझ्या फुप्फुसात पाणी झाले होते.सुरुवातीला त्यांना टीबी असल्याचे वाटले पण मला कॅन्सर झाला होता.हे कुटुंबाला कसे सांगावे हा प्रश्न त्यावेळी माझ्यापुढे होता असे तो म्हणाला.पुढे तो म्हणतो,'मला हे सगळ्यांना एकदम सांगून दुखवायचे नव्हते मी आधी माझ्या बहिणीला बोलावून तिला सांगितले.'मला कॅन्सर झालाय,पुढे काय? ती बोलली आपल्याला नियोजन करून उपचार करावा लागेल.त्यानंतर मी पुढले ३-४ तास रडलो कारण माझ्या नंतर मला माझ्या मुलांचा,बायकोचा आणि पुढल्या आयुष्याचा विचार येत होता.पण नंतर स्वतःची समजून काढून मी उपचार घेण्याचे ठरवले. आधी अमेरिकेत उपचार घेण्याचे ठरले पण व्हिजा मिळाला नाही.त्यामुळे मी इथेच उपचार घेण्याचे ठरवले.

संजयने त्याच्या वाईट व्यसनाविषयी लोकांपासून न लपवता नेहमीच त्यावर उघडपणे बोलण्याचे धाडस केले आहे.दशकांपासून काम करत असलेल्या या अभिनेत्याने अनेक वाईट परिस्थितीशी झुंज देत मोठ्या पडद्यावर जोमाने काम करायला सुरुवात केली आहे.संजय आणखी एकदा त्याच्या पुढील अक्षय कुमारच्या स्टॅरर-पृथ्वीराज या चित्रपटात दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT