Sanjay Dutt Net Worth esakal
मनोरंजन

Sanjay Dutt Net Worth : बॉलीवूडचा मुन्ना भाई आहे एवढ्या कोटींचा मालक

फिल्म इंडस्ट्रीला अनेक हिट मूव्हीज देणारा अभिनेता संजय दत्त एकेकाळी वादग्रस्त विधानांसाठी चांगलाच चर्चेत होता

साक्षी राऊत

Sanjay Dutt Net Worth : अभिनेता संजय दत्तची ओळख त्याच्या खऱ्या नावापेक्षा मुन्ना भाई म्हणून जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही. आज संजय दत्तचा वाढदिवस. फिल्म इंडस्ट्रीला अनेक हिट मूव्हीज देणारा अभिनेता संजय दत्त एकेकाळी वादग्रस्त विधानांसाठी चांगलाच चर्चेत होता. त्याच्या संपूर्ण करियरमध्ये बरेच अडथळे आलेत. मात्र सगळ्यांना सामोरे जात त्यांने बॉलीवूड इंडस्ट्रीत त्याची वेगळी ओळख बनवण्याचा प्रयत्न काही सोडला नव्हता.

सध्या सुनील दत्तचं वय ६३ वर्ष असून संजय दत्त हा प्रसिद्ध अभिनेता सुनील दत्त आणि अभिनेत्री नरगिस यांचा मुलगा आहे. १९८१ मध्ये संजय दत्तने रॉकी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. मात्र त्यानंतक त्यांच्या करियरमधील अडचणींत वाढ झाली. मात्र १९८६ मध्ये त्याने परत जोमाने कामाला सुरूवात केली. आणि यश मिळवलं.

संजय दत्तने आजवर १०० चित्रपट केले आहेत. मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटाने त्याची खास ओळख बॉलीवूडमध्ये निर्माण झाली होती. संजय दत्तने केवळ बॉलीवूडमध्ये नावच कमावले नाही तर भरपूर संपत्तीही मिळवली आहे. पाली हिल्समध्ये संजय दत्तच्या नावे ४० कोटींच आलिशान घर आहे.

या घराला हस्तीदंत आणि डिसेंट रंगाच्या फर्निचरने सजवण्यात आलं आहे. संजय दत्त या घरात त्यांच्या दोन मुलांसह आणि पत्नीसह राहतो. संजय दत्तने बॉलीवूडमध्ये चार दशकांपेक्षा जास्त वेळ काम केले आहे. त्याची एकूण संपत्ती २९५ कोटी आहे.

अलीकडेच संजय दत्तने एक एल्कोबेव ब्रांड लॉन्च केलाय. शिवाय त्याने कार्टेल अँड ब्रदर्स नावाच्या स्टार्टअमध्येसुद्धा गुंतवणुक केली आहे. तो स्कॉच व्हिस्की द ग्लेनवॉकचासुद्धा मालक आहे. संजय दत्त व्हिस्किचा शौकिन असल्या कारणाने त्याने ब्रांडमध्ये गुंतवणुक केली आहे. एका मुलाखतीत खुद्द त्याने याबाबत सांगितले. (entertainment news)

संजय दत्तजवळ बऱ्याच लक्झरी कारचे कलेक्शन आहे. संजय दत्तजवळ फेरारी-599 जीटीबी, रोल्स रॉयल घोस्ट, बेंटल, लँड क्रूजर, मर्सिडीज, पोर्श, डुकाटीसह अनेक लक्झरी कार्सचे कलेक्शन आहे.

जेव्हा २०२० मध्ये संजय दत्तला त्याला कँसर असल्याचे कळले तेव्हा चाहत्यांनाही धक्काच बसला होता. मात्र तो आजाराला हिंमतीने पुढे गेला. कँसरवर मात केल्यानंतर त्याने बरेच चित्रपट केले. सध्या तो त्याच्या लियो या चित्रपटावर काम करतोय. हा चित्रपट यंदा ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 52 अंकांच्या वाढीसह बंद; सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जबरदस्त वाढ

ठरलं! स्टार प्रवाहवरील आणखी एक कार्यक्रम घेणार निरोप; त्याजागी दिसणार 'हा' शो; प्रोमो व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील वाघोली येथील भंगार दुकानाला भीषण आग

Solapur News: मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, 17 गावांच्या आरक्षणात बदल

Railway Jobs 2025: रेल्वे मध्ये १० वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती सुरु; प्रशिक्षणादरम्यान मिळेल आकर्षक मासिक वेतन!

SCROLL FOR NEXT