Sanjay Dutt: विजयच्या 'थलापती 67' मधून समोर आला संजय दत्तचा दमदार लूक, फी ऐकून बसेल धक्का

KGF 2 नंतर खलनायक म्हणून संजय दत्तचा हा दुसरा साऊथ चित्रपट आहे. 'थलपती 67' मधूनही त्याचा लूक समोर आला आहे जो खूप दमदार आहे.
Sanjay Dutt
Sanjay Dutt Sakal

थलपथी विजयचा 'थलपथी 67' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. एकामागून एक या चित्रपटातील स्टारकास्टचे अनावरण होत आहे, त्याचप्रमाणे त्यांचा लूकही समोर येत आहे. या चित्रपटात संजय दत्तची नकारात्मक भूमिकाही दिसणार आहे. KGF 2 नंतर खलनायक म्हणून त्याचा हा दुसरा साऊथ चित्रपट आहे. 'थलपती 67' मधूनही त्याचा लूक समोर आला आहे जो खूप दमदार आहे.

'थलापथी 67' मधील त्याचा दमदार लूक शेअर करून निर्मात्यांनी तमिळ सिनेमात संजय दत्तचे स्वागत केले आहे. 'KGF 2' च्या अफाट यशानंतर संजय दत्त साउथ सिनेमाचा डिमांडिंग अभिनेता बनला आहे. संजू बाबाही साऊथच्या चित्रपटांना नाही म्हणत नाही. त्यामुळेच त्याला एकामागून एक अनेक चित्रपट येत आहेत.

Sanjay Dutt
Pamela Anderson: '80 वर्षाच्या वृद्धासोबतची ती रात्र..', आत्मचरित्रातून पामेलाचा धक्कादायक खुलासा

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर संजय दत्त 'थलपती 67' साठी मोठी रक्कम घेत आहे. या चित्रपटासाठी संजय दत्तने 10 कोटी रुपये घेतले आहेत. या चित्रपटाचा भाग झाल्यामुळे तो खूप आनंदी आहे. त्याचे विधान चित्रपटाच्या निर्मात्यांनी देखील शेअर केले आहे, ज्यात असे लिहिले आहे की, 'जेव्हा मी थलपथी 67 चे वन लाइनर ऐकले, त्याच वेळी मी ठरवले होते की मला या चित्रपटाचा भाग बनायचे आहे'.

चित्रपटाच्या टाइटलची घोषणा अद्याप झालेली नाही, सध्या हा चित्रपट 'थलपती 67' नावाने चर्चेत आहे. लोकेश कनागराज दिग्दर्शित हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असेल. लोकेशने यापूर्वी 'विक्रम'सारखे सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. या चित्रपटात विजय, संजय व्यतिरिक्त त्रिशा, प्रिया आनंद, गौतम मेनन, अर्जुन सर्जा आणि मन्सूर अली खान हे कलाकार दिसणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com