Sanju Box Office Collection 3 day
Sanju Box Office Collection 3 day 
मनोरंजन

तिसऱ्या दिवशीही 'संजू' बॉक्स ऑफिसवर सुसाट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला आणि चित्रपटाला या वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जोरदार कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. पहिल्या तीन दिवसात या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला असून, पहिल्या तीन दिवसात या चित्रपटाने एकूण 115 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

पहिल्या दोन दिवसात या चित्रपटाने 73.35 कोटी रुपयांचा गल्ला जमवाला होता, त्यामध्ये रविवारी जवळपास 42 कोटी रुपयांची भर टाकून 115 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. या वर्षातील या चित्रपटाने रेस 3, पद्मावत, बागी 2 यां चित्रपटांना मागे टाकत यांच्यापेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. पहिल्या आठवड्यात कमाईचे बरेच रेकॉर्ड हा चित्रपट मोडेल असं मत चित्रपट व्यापार विश्लेषक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित 'संजू' चित्रपट शुक्रवारी (ता.29) प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने साकारली असून, संजय दत्तच्या आयुष्यात नेमके काय घडले याची सत्यकथा या चित्रपटातून उतरवण्याचा प्रयत्न राजकुमार हिरानी यांनी केला. या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित माहिती देण्यात आली आहे. संजय दत्त जसा होता, अगदी तशीच बाजू या चित्रपटात दाखवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसह अभिनेता परेश रावल, अनुष्का शर्मा, विकी कौशल, दिया मिर्झा, सोनम कपूर, करिश्मा तन्ना आणि मनिषा कोईराला यांच्या भुमिका आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT