kgf chapter-2 movie sakal
मनोरंजन

ऑन स्क्रीन : केजीएफ चॅप्टर-२ : ॲक्शनचा ‘ओव्हर डोस’

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता, त्यापाठोपाठ दिग्दर्शक प्रशांत नीलच्या ‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटाने उत्पन्नाचे विक्रम प्रस्थापित केले.

संतोष भिंगार्डे

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता, त्यापाठोपाठ दिग्दर्शक प्रशांत नीलच्या ‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटाने उत्पन्नाचे विक्रम प्रस्थापित केले.

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता, त्यापाठोपाठ दिग्दर्शक प्रशांत नीलच्या ‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटाने उत्पन्नाचे विक्रम प्रस्थापित केले. केवळ तमीळ-कन्नड, मल्याळम वा तेलगू या भाषांमध्ये नाही, तर हिंदीबहुल पट्ट्यातही हा चित्रपट प्रचंड यश मिळवीत आहे. दिग्दर्शकाने ही कथा अतिशय रंजकपणे आणि अतिभव्यतेनं मांडली आहे.

आपल्या आईची इच्छा पूर्ण करणाऱ्या रॉकी (यश) या जिद्दी आणि जिगरबाज नायकाची ही कथा आहे. केवळ मुंबई आणि आसपासच्या राज्यांमध्येच नाही तर संपूर्ण भारतावर राज्य करण्याची इच्छा बाळगणाऱ्या धाडसी आणि महत्त्वाकांक्षी रॉकीची कहाणी चित्तथरारक आणि तितकीच रोमांचक झाली आहे. या कथेला मनोरंजनाबरोबरच भावनिकतेचे विविध पदर दिग्दर्शकाने जोडले आहेत. तब्बल चार वर्षांनी ‘केजीएफ’चा हा दुसरा भाग आला आहे आणि तो प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करणारा झाला आहे. लहान असताना परिस्थितीमुळे पिचलेला रॉकी आता मोठा झालेला असतो. आपल्या आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी तो धडपडत असतो. त्याला जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती व्हायचे असते. ‘केजीएफ’ ही सोन्याची खाण मिळविण्यासाठी तो धडपडत असतो. खरे तर हा मार्ग सोपा नसतो, कारण या वाटचालीत त्याला अनेक शत्रू निर्माण होत असतात. मात्र, गोरगरीबांसाठी तो देव असतो. रॉकीचा सर्वांत मोठा शत्रू असतो गरुडाचा भाऊ अधिरा (संजय दत्त). त्याची तलवार रक्ताला तहानलेली असते. केजीएफवर आपलेच साम्राज्य असले पाहिजे याकरिता त्या दोघांचा आटापिटा चाललेला असतो. मग अधिरा आणि रॉकी यांच्यामध्ये तीव्र संघर्ष होतो. त्यामध्ये रॉकीच्या छातीवर गोळी लागते. त्यातून रॉकी वाचतो का, आपल्या आईला दिलेले वचन तो पूर्ण करतो का, श्रीनिधीचे प्रेम मिळविण्यात तो यशस्वी ठरतो का, अशा प्रश्नांच्या उत्तरासाठी हा चित्रपट पाहावा लागेल.

दिग्दर्शकाने पहिल्या भागापेक्षा दुसऱ्या भागावर अधिक मेहनत घेतली आहे, तसेच तो अधिक मनोरंजनात्मक बनविण्याचा प्रयत्न केला आहे. यात तो यशस्वीही झाला आहे. कलाकारांचा अभिनय, चित्रपटातील खुसखुशीत आणि ठसकेबाज संवाद तसेच ॲक्शन, उच्चदर्जाची निर्मितिमूल्ये, कथेला पटकथेची मिळालेली योग्य जोड, सिनेमॅटोग्राफी अशा अनेक जमेच्या बाजू आहेत. यशचा स्टायलिश लुक, स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची चाललेली धडपड तसेच विविध भावभावना त्याने डोळ्यांतून छान रेखाटल्या आहेत. त्याची ॲक्शन धडाकेबाज आहे. अधिरा ही खलनायकी भूमिका संजय दत्तने बेमालूमपणे साकारली आहे. त्याची व रॉकीची ॲक्शन थरारक झाली आहे. रविना टंडन, प्रकाश राज या कलाकारांनी आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत. पंतप्रधानांची भूमिका रविनाने छान वठविली आहे. तिच्या वाट्याला काही मोजकीच दृश्ये आली आहेत. परंतु, त्यामध्ये तिने बाजी मारली आहे. अभिनेत्री श्रीनिधी शेट्टीला या चित्रपटात फारसा वाव दिलेला नाही. चित्रपट सुरुवातीला काहीशी निराशा करणारा झाला आहे, मात्र नंतर चित्रपट चांगलीच पकड घेतो.

चित्रपटाची लांबी खटकणारी आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीत काहीसे लाऊड झाले असले, तरी मनोरंजन आणि ॲक्शनचा हा ओव्हर डोस प्रेक्षकांच्या गळी उतरवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff Announcement : डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी सहा देशांवर फोडला टेरिफ बॉम्ब; जाणून घ्या, आता कुणाचा नंबर लागला?

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

SCROLL FOR NEXT