satish neena 
मनोरंजन

सतीश कौशिक यांनी गर्भवती नीना यांना लग्नासाठी केलं होतं प्रपोज

नीना यांच्या आत्मचरित्रात खुलासा

स्वाती वेमूल

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री नीना गुप्ता Neena Gupta यांचं आत्मचरित्र 'सच कहूँ तो' सध्या फार चर्चेत आहे. नीना यांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे या आत्मचरित्रात केले आहेत. अभिनेते सतीश कौशिक Satish Kaushik यांनी नीना यांना लग्नाची मागणी घातल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत रिलेशनशिपमध्ये असताना नीना गरोदर राहिल्या होत्या. ८० च्या दशकात या दोघांचं रिलेशनशिप फार चर्चेत होतं. नीना यांना मसाबा गुप्ता ही मुलगी असून त्यांनी एकटीनेच तिचं संगोपन केलं. मात्र मसाबाच्या जन्माच्या आधी सतीश कौशिक यांनी नीना यांना लग्नाची मागणी घातली होती. (Satish Kaushik offered to marry Neena Gupta when she was pregnant with Masaba)

'फिल्म कम्पॅनियन'ने नीना यांच्या 'सच कहूँ तो' या आत्मचरित्राचं समिक्षण केलं आहे. त्यानुसार, नीना गरोदर असताना सतीश यांनी लग्नाबद्दल त्यांना विचारलं होतं. 'काळजी करू नकोस, जर बाळ सावळ्या रंगाचा जन्मला, तर तू थेट म्हण की ते माझं मूल आहे आणि आपण दोघं लग्न करू. कोणाला कसलाच संशय येणार नाही', असं ते नीना यांना म्हणाले होते.

मसाबा ही नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजच्या संघातील माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. मसाबासाठी नीना आणि विवियन यांनी नेहमीच काही कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावली होती. मसाबा हे नाव सध्या फॅशन विश्वातील फार प्रसिद्ध नाव आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोठमोठ्या कलाकारांसाठी ती फॅशन डिझायनिंग करत असून 'हाऊस ऑफ मसाबा' या नावाने तिचा स्वत:चा फॅशन ब्रँडसुद्धा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT