Satish Kaushik's last words "Mujhe bacha lo, main marna nahin chahta" Heartbreaking details revealed by manager Santosh  sakal
मनोरंजन

Satish Kaushik:मला मरायचं नाहीय, मला वाचवा.. माझ्या.. शेवटच्या क्षणी काय म्हणाले सतीश कौशिक..

सतीश कौशिक यांच्या निधनाबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.

नीलेश अडसूळ

Satish Kaushik's last words: बॉलीवुड मधील एक दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी 9 मार्च रोजी निधन झाले. ते अवघ्या 66 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने बॉलीवूडवर मोठी शोककळा पसरली. त्यांच्या अभिनयाने आणि स्वच्छंदी स्वभावाने त्यांचा मित्र आणि चाहता परिवार मोठा होता. गुरुवारी रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. पण आता त्यांच्या मृत्यूबाबत नवी माहिती समोर येत आहे.

सतीश कौशिक यांचा मृत्यु हृदय विकाराच्या झटक्याने झाला असल्याचे स्पष्ट केल्यानंतर या प्रकरणार दिल्ली पोलिसांनी पुन्हा नवी माहिती दिली आहे. हा मृत्यू की घातपात यावर आता जोरदार शोध सुरू आहे. पण सतीश कौशिक शेवटच्या क्षणी काय म्हणाले हे आता त्यांच्या मॅनेजरने उघड केले आहे.
(Satish Kaushik's last words "Mujhe bacha lo, main marna nahin chahta" Heartbreaking details revealed by manager Santosh )

सतीश कौशिक हे गुरुवारी दिल्ली मध्ये होते. त्या आधी सलग 15 दिवस ते वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त प्रवास करत होते. यंदाची होळी दिल्लीतील मित्रांसोबत करायची त्यांची खूप इच्छा होती. या त्याच्या सर्व प्रवासात त्यांचा मॅनेजर संतोष राय त्यांच्या सोबत होता.

संतोष म्हणाला की, दिल्लीमध्ये सगळं कही ठीक होतं. अगदी रात्रीचं जेवण आवरलं. उद्या मुंबईत निघायच म्हणून त्याचीही तयारी झाली. सरांनी काही कामं आवरली. त्यानंतर 11 वाजता ते 'कागझ 2' चित्रपटाचा काही भाग पाहत होते, जो लवकरच रिलीज होणार आहे.

''त्यांतर 12 वाजता अचानक ते माझं नाव घेऊन ओरडू लागले. मलाही धक्का बसला. मी त्यांच्याजवळ गेलो तर ते म्हणाले मला श्वास घ्यायला त्रास होतोय. त्यांना प्रचंड अॅसिडिटी झाली होती. ते खूपच अस्वस्थ झाल्याने त्यांनी तातडीने डॉक्टर बोलवण्यास सांगितला.

'मग आम्ही तातडीने दिल्लीतील रुग्णालयात गेलो. तिथे त्यांना दाखल करण्यात आलं. पण त्यांची अवस्था थोडी खालवत होती. त्यामुळे त्यांच्या घरी आणि नातेवाईकांना पण याची कल्पना दिली. त्यांनाही मोठा धक्का बसला.'

'मग सतीश यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले की मला वाचवा, मला मारायचं नाहीय.. त्यांच्यावर उपचार सुरू केल्यावरही ते म्हणाले, मला वाटतंय मी वाचेन.. कारण मला वंशिका साठी म्हणजे माझ्या मुलीसाठी जगायचं आहे. शशी ची आणि वंशिकाची काळजी घ्या..' अशीही माहिती संतोष यांनी दिली.

संतोष म्हणाले की, 'त्यांचा मुलीवर प्रचंड जीव होता. त्यांना तीचं शिक्षण करायचं होतं, तिचं लग्न पाहायचं होतं.' पण दुर्दैवाने त्यांनी लवकरच एक्झिट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

APL 2025: ६,६,६,४,४,४... पी अर्जुन तेंडुलकरचा १२ चेंडूत धुमाकूळ! स्फोटक फलंदाजीनं वेधलं लक्ष

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: मराठवाड्यात मोठी धरणे आणि प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दिशेने

SCROLL FOR NEXT