Saumya Kamble, India’s Best Dancer 2 winner Instagram
मनोरंजन

India’s Best Dancer 2 winner: पुण्याच्या सौम्या कांबळेनं जिंकला 'इंडियाज बेस्ट डान्सर'चा किताब

बक्षिस म्हणून मिळाले १५ लाख रुपये आणि आलिशान कार

स्वाती वेमूल

सोनीवर इंडियाज बेस्ट डान्सर सिझन २चा (India’s Best Dancer 2) अंतिम सोहळा नुकताच पार पडला. या शोला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते आणि त्यांच्यामधून एकाची इंडियाज बेस्ट डान्सर म्हणून निवड करण्यात आली. मराठमोळ्या सायली कांबळेनं (Saumya Kamble) 'इंडियाज बेस्ट डान्सर'चा किताब पटकावला आहे. तर गौरव सरवन हा दुसऱ्या क्रमांकावर होता. सौम्या कांबळे, जमृद, रोझा राना, रिक्तम ठाकुरिया आणि गौरव सरवन हे पाच जण अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. त्यांच्यामध्ये ट्रॉफी मिळवण्यासाठी तीव्र चुरस रंगली होती. अंतिम सोहळ्यात या पाचही स्पर्धकांनी एकापेक्षा एक धमाकेदार परफॉर्मन्स सादर केले. या शोचे परीक्षक मलायका अरोरा, टेरेन्स लुईस आणि गीता कपूर हे होते.

सौम्याला बक्षिस म्हणून १५ लाख रुपयांचा धनादेश आणि एक आलिशान कार मिळाली. या सिझनमध्ये सौम्याला प्रशिक्षण देणारी कोरिओग्राफर वर्तिका झा हिलादेखील सन्मानित करण्यात आलं होतं. वर्तिकाला ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. पहिल्या सिझनमध्ये वर्तिकानं टायगर पॉपला प्रशिक्षण दिलं होतं. त्यानंसुद्धा ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. त्यामुळे कोरिओग्राफर म्हणून वर्तिकाचा हा सलग दुसरा विजय आहे. जयपूरचा गौरव सरवन उपविजेता ठरला तर ओडिशाची रोजा राणा तिसऱ्या क्रमांकावर होती. अंतिम फेरीत पोहोचलेल्या सर्व स्पर्धकांना १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

संपूर्ण प्रवासात सौम्याने फ्री-स्टाइल आणि बेली डान्सिंग या नृत्यप्रकारांनी परीक्षकांची मनं जिंकली होती. "या दिवसासाठी मी खूप मेहनत घेतली आहे आणि आता ट्रॉफी जिंकल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे", अशा शब्दांत सौम्याने आनंद व्यक्त केला. सौम्याने डान्सर न होता डॉक्टर बनावं अशी तिच्या वडिलांची इच्छा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: पुणे पोलिस आयुक्तालयात दोन नवीन परिमंडळे, पाच नवीन पोलिस ठाणी मंजूर!

IND vs SA: बुमराहपाठोपाठ हार्दिकचीही खास सेंच्युरी! 'असा' पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय ऑलराऊंडर

Maharashtra Sand Mafia: वाळू माफियाविरोधात मोठी कारवाई लवकरच! मुख्यमंत्र्यांचे ठाम आश्वासन, काय म्हणाले?

Who Is Nitin Nabin: दिल्लीच्या राजकारणात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; भाजपचे सर्वात तरुण कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन कोण?

Lionel Messi: मेस्सीसाठी स्वागत, पण भारतीय खेळाडूंची ओळख पुसली! भारतीय फुटबॉलसाठी धक्कादायक क्षण

SCROLL FOR NEXT