bollywood filmmaker scam 1992 hansal mehta corona positive covid 19 after family Team esakal
मनोरंजन

'रिस्क है तो इश्क है', जो जिंकेल तो हंसल मेहताच्या वेबसीरिजमध्ये

बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक हंसल मेहता hansal mehata हे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण दिग्दर्शनामुळे लोकप्रिय झाले आहेत.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक हंसल मेहता hansal mehata हे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण दिग्दर्शनामुळे लोकप्रिय झाले आहेत. त्यांची स्कॅम 1992 scam 1992 नावाची मालिका ही आता केवळ भारतातच नाही तर जगातील काही देशांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. त्या मालिकेमुळे हंसल मेहताही किती ताकदीचे दिग्दर्शक आहेत याची प्रेक्षकांना ओळख झाली असे म्हणता येईल. आता त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यात त्यांनी तरुणांना आवाहन केले आहे. जे त्या शो मध्ये आपल्या कामगिरीनं मेहता यांचे लक्ष वेधून घेतील अशा विजेत्यांना मेहता यांच्या वेबसीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

सध्या सोशल मीडियावर याप्रकाराची मोठ्या प्रमाणावर चर्चा असल्याचे दिसुन आले आहे. मेहता हे एक टँलेट शो मध्ये परिक्षकाची भूमिका करणार असल्याची माहिती मिळाली आहे. में भी सुपस्टार या नावानं हा शो एमएक्स टकाटकवर सुरु होणार आहे. त्यातून नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा मानस असल्याचे त्या मालिकेच्या निर्मात्यांनी सांगितलं आहे. या शो मध्ये जे स्पर्धक विजेते होतील त्यांना हंसल मेहता यांच्या वेबसीरिजमध्ये काम करण्याची संधी दिली जाणार असल्याचे त्या शो च्या निर्मात्यांच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.

हंसल मेहता यांनी या मालिकेच्या विषयी आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून माहिती दिली आहे. त्यात त्यांनी सांगितल्यानुसार, या शो मध्ये भाग घेणाऱ्यांना आपला 15 सेकंदाचा एक व्हिडिओ तयार करुन पाठवायचा आहे. या 15 सेकंदामध्ये त्यांनी परिक्षकांना एम्प्रेस करायचे आहे. तसे झाल्यास त्यांना पुढच्या फेरीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. आणि त्यातही ते विजयी झाल्यास निर्मात्यांनी सांगितल्याप्रमाणे मेहता यांच्या मालिकेत काम करण्याची संधी संबंधित त्या स्पर्धकाला मिळणार आहे.

संबंधित स्पर्धकाचं अभिनय कौशल्य, भाव अभिव्यक्ती, संवाद कौशल्य, यांचंही निरिक्षण केलं जाणार आहे. मेहता हे या शो मधून सर्वोत्तम 3 क्रिएटर्सची निवड करणार आहे. त्यांना एमएक्स प्लेयरवरील एका मालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली जाणार आहे. मेहता यांच्या आगामी चित्रपटामध्ये करिना कपूर बरोबर स्कॅम 1992 मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतलेला प्रतिक गांधीही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: आई, मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही... ; खाजगी व्हिडिओवरून ब्लॅकमेल झाल्यामुळे मुंबईत CA ने संपवले जीवन

Video : वाढदिवस ठरला शेवटचा..! केक कापताना घडली भयंकर घटना, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल..

कुटुंबात किती लोक? कोणत्या जातीचे आहात? आता संपूर्ण माहिती तुम्ही घरबसल्या सांगू शकणार; जनगणनेत दिसणार 'हा' पर्याय

Latest Maharashtra News Updates : विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवल्याने सरकार विरोधात विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन

Polytechnic Admissions 2025: कोणते कॉलेज निवडू, कोणती शाखा निवडू ? पॉलिटेक्निक प्रवेशाकरिता काउंटडाऊन सुरू

SCROLL FOR NEXT