seema deo death son ajinkya deo and abhinay deo popular in marathi and bollywood industry family details SAKAL
मनोरंजन

Seema Deo: रमेश देव आणि सीमा देवच नाही तर त्यांच्या पुढच्या पिढीने देखील अख्खी भारतीय फिल्म इंडस्ट्री गाजवली

सीमा आणि रमेश यांच्या दोन्ही मुलांनी मनोरंजन विश्वात स्वतःची छाप पाडलीय

Devendra Jadhav

Seema Deo Passed Away: सीमा देव यांचं आज वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं. सीमा देव या गेल्या अनेक दिवसांपासुन अल्झायमर आजाराने ग्रस्त होत्या. सीमा देव यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केलाय.

सीमा देव आणि रमेश देव यांनी मराठी मनोरंजन विश्वातील एक काळ गाजवलाय. या दोघांची जोडी सदाबहार जोडी म्हणुन ओळखली जायची. सीमा आणि रमेश यांच्या पुढच्या पिढीने सुद्धा मनोरंजन विश्वात स्वतःची छाप पाडलीय.

सीमा - रमेश देव यांच्या दोन्ही मुलांनी मराठीच नव्हे तर बॉलिवूडही गाजवलंय

अजिंक्य देव

सीमा - रमेश देव यांनी मराठीच नव्हे तर हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा स्वतःच्या अभिनयाच्या माध्यमातुन नवी ओळख मिळवली. आई - बाबांंच्या पावलावर पाऊल ठेऊन सीमा आणि रमेश यांची मुलं अजिंक्य देव आणि अभिनय देव या दोघांनीही मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये दखलपात्र काम केलंय.

सीमा - रमेश देव यांचा मुलगा अजिंक्य देवने मराठीत सर्जा, वासुदेव बळवंत फडके, रिंगा रिंगा, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये अभिनय केलाय. याशिवाय अजिंक्यने दिग्दर्शित केलेल्या जेता या सिनेमात सीमा - रमेश देव दोघांनीही अभिनय केलाय.

अजिंक्य देवने मराठीच नव्हे तर हिंदी मनोरंजन विश्वात सुद्धा दर्जेदार सिनेमांमध्ये अभिनय केलाय. आन, तान्हाजी, प्यासी निघाहे अशा सिनेमांमध्ये अभिनय केलाय.

सीमा देव यांचा मुलगा अभिनय देव

सीमा देव यांचा मुलगा अभिनय अभिनय देवने बॉलिवूडमध्ये काही मोजक्या सिनेमांचं दिग्दर्शन करुन बॉलिवूडला स्वतःची दखल घ्यायला भाग पाडलंय. अभिनय देवने दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच सिनेमात अभिषेक बच्चन, बोमन इराणी अशी तगडी स्टारकास्ट होती. या सिनेमाचं नाव गेम. पण हा सिनेमा फ्लॉप झाला.

पुढे आमिर खान निर्मित दिल्ली बेल्ली सिनेमाचं दिग्दर्शन अभिनय देव यांनी केलं. हा सिनेमा मात्र सुपर डुपरहिट झाला. पुढे इरफान खानचा ब्लॅकमेल, जॉन अब्राहम सोबत फोर्स 2 अशा सुपरहिट सिनेमाचं दिग्दर्शन अभिनय देव यांनी केलंय.

अशाप्रकारे सीमा - रमेश देव यांच्या दोन्ही मुलांनी मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात स्वतःचं स्थान मिळवलंय.

प्रदीर्घ आजाराने सीमा देव यांचं निधन

सीमा देव यांना अल्झायमरचा त्रास सुरु झाला होता. सीमा यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत आई लवकर बरी होऊ दे यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं होतं. गेल्या काही काळापासून सीमा त्यांच्या मुलासोबत मुंबईतील वांद्रे येथे राहत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs GT Live : वन अँड ओन्ली शुभमन गिल! IPL मध्ये नोंदवला विराट, रोहितलाही न जमलेला विक्रम... सुदर्शनसह मिळून आणखी एक पराक्रम

Pune Highway Protest: दोन दिवसांत आरोपींना बेड्या ठोकल्या नाहीत, तर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला जाईल," - आमदार रोहित पवार

LPL Rules: क्रिकेटमधील धक्कादायक नियम! फॉलोअर्सनुसार खेळाडूंची लीगमध्ये निवड होणार; नव्या नियमाने चाहत्यांमध्ये संताप

School Safety: नवीन तमलूर जि.प. शाळेची इमारत धोक्यात; पावसाळ्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने स्थलांतराची ग्रामस्थांची मागणी

Megablock: मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ब्लॉक, लोकलसह मेल-एक्स्प्रेसवरही परिणाम, पण कधी? पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT