Shabana Azmi
Shabana Azmi  file image
मनोरंजन

शबाना आझमींना मद्याची 'ऑनलाइन ऑर्डर' पडली महागात

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी(Shabana Azmi) यांच्यासोबत नुकताच ऑनलाइन पेमेंट फ्रॉड झाला आहे. शबाना यांनी ऑनलाइन मद्य ऑर्डर केले होते. त्या मद्याचे पैसे त्यांनी ऑनलाइन दिले. ऑनलाइन पेमेंट झाले तरी देखील त्यांच्या ऑर्डरची डिलेव्हरी झाली नाही. शबाना यांनी याबद्दल एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये या फ्रॉडबद्दल त्यांनी माहिती दिली. शबाना यांनी ट्विट केले, 'सावध राहा, माझी फसवणूक झाली आहे.लिव्हिंग लिक्विडला मी ऑनलाइन पेमेंट केले पण जेव्हा ऑर्डर केलेली वस्तू आली नाही तेव्हा त्यांनी माझे कॉल स्विकारले नाही. मी ज्या खात्यावर ऑनलाइन पेमेंटची माहिती मी देत आहे. खाते क्रमांक- 919171984427. IFSC- PYTM0123456. नाव- लिव्हिंग लिक्विड आहे. पेटीएम पेमेंट बँक.'(Shabana Azmi conned in online payment scam of shares details)

शबाना यांच्या या ट्विटला रिप्लाय देऊन अनेकांनी त्यांना ऑनलाइन फ्रोडबद्दल माहिती दिली. एका यूझरने त्यांना कमेंट केली, 'दारूच्या डिलेव्हरीचे गूगलवर दाखवण्यात आलेले अनेक फोन नंबर हे खोटे असतात.' एका नेटकऱ्याने शबाना यांना पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला. शबानांच्या एका चाहत्याने मात्र लिविंग लिक्विड कंपनीची बाजू घेत कमेंट केली आहे. त्याने कमेंट लिहीली, 'मॅडम तुम्ही दिलेला नंबर फेक आहे. पण लिव्हिंग लिक्विड तुम्हाला धोका देणार नाही.'

एका यूझरने हे लिकर स्कॅम मुंबईमध्ये सुरू आहे अशी माहिती दिली आहे. त्याने शबाना यांच्या ट्विटवर कमेंट केली, 'हा दारूच्या दुकानाचा घोटाळा आहे जो मुंबईमध्ये पसरत आहे. फेक नंबर किंवा फेक लोग लिविंग लिक्विडच्या कंपनीच्या नावाने लोकांना धोका देत आहेत. मला माहित झालेली ही तिसरी घटना आहे. अशा अनेक घटना गेली काही दिवस घडत आहेत. ज्यामध्ये एका माणसासोबत 42 हजाराचा फ्रोड झाला आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : एक दंगल झाली आणि त्यामुळे जगात कामगार दिन साजरा होऊ लागला, वाचा इतिहास

Maharashtra Din 2024 : बहु असोत सुंदर संपन्न की महा..प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.! महाराष्ट्र दिनाच्या द्या हटके शुभेच्छा

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

SCROLL FOR NEXT