Jawan Trailer Esakal
मनोरंजन

Jawan Prevue Trailer: मैं कौन हूं कौन नही! शाहरुख खानचा राडा..अखेर जवानचा ट्रेलर रिलिज..

Vaishali Patil

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. मात्र सध्या शाहरुख त्याच्या मोस्ट अवेटेड 'जवान' चित्रपटामुळे खुप चर्चेत आहे. पठाण च्या दमादार कमाईनंतर शाहरुख जवानच्या माध्यमातुन पुन्हा बॉक्स ऑफिसवर वादळ तयार करण्यासाठी तयार आहे. चित्रपटाशी संबधित प्रत्यक अपडेटवर चाहत्यांचे लक्ष आहेच.

शाहरुखचे चाहते त्याच्या जवान चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. पण निर्मात्यांनी ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर करताच चाहत्यांनी काउनडाउन सुरु केला होता.

जवान चित्रपटाचा ट्रेलर 10 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता प्रदर्शित करण्यात आला . रेड चिलीज एंटरटेनमेंटने त्याच्या युट्यूब चॅनलवर हा ट्रलेर रिलज केला आहे.

शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचा प्रिव्ह्यू अॅक्शन पॅक आहे. प्रिव्ह्यूची सुरुवात शाहरुख खानच्या आवाजाने होते. ज्यामध्ये तो म्हणतो, 'मी कोण आहे हे मला माहीत नाही, माझा कोणताही हेतू नाही. स्वतःला विचारा की मी पुण्य आहे की पाप आहे कारण मी देखील तू आहेस. तयार. नाव ऐकले असेल."

चित्रपटात शाहरुख अॅक्शन अवतरात दिसत आहे. त्यासोबत ट्रेलरमध्ये तुम्हाला दिपिकाही दिसेल. तिचा फायटिंग सीन जबरदस्त आहे.

ट्रेलर तीन भाषांमध्ये रिलीज करण्यात आला. तो हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होत आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर 2 मिनिटे 15 सेकंदांचा आहे.

जवान या चित्रपटात शाहरुख खान आणि नयनतारा मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत विजय सेतुपती, रिद्धी डोगरा, सुनील ग्रोव्हर हे कलाकारही आपल्या अभिनय करणार आहे. पठाण या चित्रपटानंतर जगभरातील प्रेक्षकांच्या नजरा शाहरुख खानच्या जवानवर खिळल्या आहेत. त्यातच आता ट्रेलर रिलज झाल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT