Ind vs Aus World Cup 2023 Final Shah rukh Khan video esakal
मनोरंजन

Shah Rukh Viral Video : दिल जीत लिया ! आशाताईंसाठी केलेल्या किंग खानच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं

साऱ्या देशाचं लक्ष ज्या सामन्याकडे लागलं आहे त्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड कपच्या फायनलचा सामना रंगतो आहे.

युगंधर ताजणे

Ind vs Aus World Cup 2023 Final Shah rukh Khan video : साऱ्या देशाचं लक्ष ज्या सामन्याकडे लागलं आहे त्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड कपच्या फायनलचा सामना रंगतो आहे. भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना २४० धावा केल्या आहेत. त्यावर ऑस्ट्रेलियानं सावध सुरुवात केली होती. मात्र हाती आलेल्या माहितीनुसार त्यांनी तीन विकेट गमावल्या आहेत.

या सगळ्यात बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी भारतीय क्रिकेट टीमचा पाठींबा देण्यासाठी मोदी स्टेडियमवर धाव घेतल्याचे दिसून आले. त्यात किंग खान शाहरुखपासुन रणवीर सिंह पर्यत अनेकांची उपस्थिती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. अशातच शाहरुखचा तो व्हिडिओ समोर आला आणि तो त्याच्या चाहत्यांच्या, नेटकऱ्यांच्या कौतुकाचा विषय झाला आहे.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

फायनलच्या सामन्यासाठी प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी देखील हजेरी लावली होती. त्यांचा तो व्हिडिओ चहा पितानाचा व्हिडिओ आणि तो चहाचा कप शाहरुखनं उचलून घेणे यावर नेटकऱ्यांनी किंग खानचे कौतुक केले आहे. त्याला नेटकऱ्यांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया देखील चर्चेचा विषय आहे.

फायनलला किंग खान त्याचा मुलगा आर्यन खान, सुहाना, पत्नी गौरी उपस्थित आहे. बॉलीवूडच्या वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी या सामन्यासाठी हजेरी लावल्याचे दिसून आले आहे. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण तिचे वडील प्रकाश पदुकोण यांच्या उपस्थितीनं प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. यात शाहरुखच्या त्या व्हिडिओची बराचवेळ चर्चा सुरु होती.

शाहरुख खान आशाताईंसोबत संवाद साधत असताना त्यानं आशा ताईंकडून तो चहाचा कप घेतला आणि दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे दिल्याचे दिसून आले. त्या व्हिडिओनं मात्र किंग खानवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

एका नेटकऱ्यानं शाहरुखचं कौतुक करताना म्हटलं आहे की, यामुळेच शाहरुख हा सगळ्यांच्या आवडीचा अभिनेता आहे. तो खूपच प्रेमळ आणि कौतुकास पात्र असणारा सेलिब्रेटी आहे. त्याचा बाकीच्या सेलिब्रेटींच्याप्रती असणारा आदरही मोठा आहे. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Call of Duty creator accident Video : ‘कॉल ऑफ ड्यूटी’ प्रसिद्ध व्हिडिओ गेम निर्माते विन्स झॅम्पेला यांचे भयानक अपघातात निधन!

Pune Traffic Diversion : नाताळ सणानिमित्त लष्कर परिसरात वाहतूक बदल; एम. जी. रोडवर निर्बंध!

Pakistan Airline Sold: कंगाल पाकिस्तानच्या इंटरनॅशनल एअरलाइन्सची झाली विक्री!

Supriya Sule : दोन्ही राष्ट्रवादीत चर्चा सुरू; मात्र प्रस्ताव नाही– सुप्रिया सुळे यांचा स्पष्ट खुलासा!

Mundhwa Land Scam : पार्थ पवारसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा- अंजली दमानिया; मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण!

SCROLL FOR NEXT