Shah Rukh Khan Says He Owns TVs Worth 30-40 Lakh, fan reacts
Shah Rukh Khan Says He Owns TVs Worth 30-40 Lakh, fan reacts sakal
मनोरंजन

शाहरुखच्या घरात ४० लाखांचे फक्त टिव्हीच.. चाहते म्हणले एवढ्यात आमचं..

नीलेश अडसूळ

Shah rukh khan : किंग खान म्हणून ओळखला जाणारा बॉलीवूड अभिनेता शाह रुख खान समाज माध्यमांची चांगलाच जोडला गेला आहे. त्याच्या आगामी 'पठाण' सिनेमाचे प्रमोशनही तो करत असतो. शिवाय आपल्या वैयक्तिक जीवनाविषयी आणि कामाविषयीही तो लिहीत असतो. शाहरुख एक उत्तम वाचक आणि कलासक्त माणूस असल्याचे त्याने वेळोवेळो दाखवून दिले आहे. शिवाय बऱ्याच सामाजिक कामातही तो सहभागी असतो. त्यामुळे त्याच्याकडे अनेकांचे लक्ष लागलेले असते. नुकतेच शाहरुख ने विधान केले. ज्यावर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. (Shah Rukh Khan reveals he owns 11-12 TVs worth Rs 30-40 lakh in his house)

अभिनेता शाहरुख खानची संपत्ती आणि श्रीमंती आपल्याला ठाऊक आहेच. मग ते मुंबईतील मन्नत बांगला असो, आलिशान गाड्या असो किंवा अख्खी क्रिकेटची टीम. बॉलिवूडमधल्या श्रीमंत व्यक्तींपैकी तो एक आहे. त्याचे शौक, त्याची हौस याची वारंवार चर्चा होत असते. आज त्यांच्या श्रीमंतीचे दर्शन पुन्हा एकदा घडले. एका कार्यक्रमात चक्क त्याने आपल्या घरात असलेले टीव्ही आणि त्यांची किंमत सांगितली.

शाहरुखने दिल्लीत एका इलेक्ट्राॅनिक उपकरणे तयार करणाऱ्या ब्रँडच्या कार्यक्रमाला गेला होता. तिथे त्याने त्याच्या राहत्या घरात किती टीव्ही आहेत? या टीव्हीची किंमत काय? याबाबत सांगितले आहे. शाहरुख या कार्यक्रमात बोलताना म्हणाला, “माझ्या तसेच माझ्या तीनही मुलांच्या बेडरुमध्ये, लिव्हींग रुममध्ये प्रत्येक रुममध्ये एक-एक टीव्ही आहे. अंदाजे ११ ते १२ टीव्ही माझ्या घरात आहेत. प्रत्येक टीव्हीची किंमत ही एक ते दीड लाख रुपयांच्या घरात आहे. साधारण ३० ते ४० लाखांचे टीव्ही माझ्या घरात आहे.' असे तो म्हणाला. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आता मजेशीर कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. “एवढ्या पैश्यांमध्ये तर आम्ही एक घर घेऊ”, “आता मला गरिब असल्यासारखं वाटत आहे”, “म्हणूनच शाहरुख किंग आहे” अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT