Suhana Khan spotted with a friend at Mannat. Google
मनोरंजन

सुहाना खान कोणाला करतेय डेट? चेहरा लपवताना कॅमेऱ्यात कैद झाला 'तो'

शाहरुखच्या मन्नात बंगल्याबाहेर सुहाना आणि तिच्या मित्राची कॅमेऱ्यासमोर चेहरा लपवताना तारांबळ उडाली,अन् चर्चा सुरू झाली.

प्रणाली मोरे

शाहरुखची(Shahrukh Khan) छोटी मुलगी सुहाना खान (Suhana Khan)परदेशातलं आपलं शिक्षण संपवून मुंबईत(Mumbai) परत आलीय. चर्चा आहे लवकरच ती झोया अख्तरच्या सिनेमात दिसणार असल्याची. आता बॉलीवबडच्या किंग खानच्या मुलीला ब्रेक न मिळाला तर नवल होतं. सुहाना खान सिनेमात एन्ट्री करतेय ही तशी अपेक्षितच बातमी. पण जेव्हा शाहरुखच्या मन्नत बंगल्याबाहेर सुहाना खान एखाद्या समवयीन अनोळखी मुलासोबत दिसते तेव्हा मात्र तो कोण? याची चर्चा नकळत सुरु होते.

Suhana Khan spotted with a friend outside Mannat.

त्याचं झालं असं की शाहरुख आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खान हिला नुकतच तिच्या एका मित्रासोबत त्यांच्या मन्नत बंगल्या बाहेर पाहिलं गेलं. तसं,हल्ली सुहाना अनेकदा मुंबईतील काही स्पॉटवर दिसली आहे. झोया अख्तरच्या ऑफिसमधूनच तिला अनेकदा बाहेर पडताना कॅमेऱ्यानं स्पॉट केलं होतं. तेव्हा तिनं चांगले उभे राहून फोटो घेऊ दिले होते,किंवा उभी राहिली नसेल तरी किमान कॅमेऱ्यासमोर चेहरा तरी लपवला नव्हता. पण मग 'मन्नत' बाहेर त्या मित्रासोबत असताना तिनं चेहरा लपवला. अन् त्या मुलानं देखील तसंच केलं. हे कॅमेऱ्यात कैद झालं अन् लगोलग व्हायरल देखील झालं.

खरंतर सुहाना आणि तो मुलगा कारच्या मागच्या सीटवर बसले होते. अचानक गाडी शाहरुखच्या मन्नत बंगल्याच्या गेटबाहेर उभी राहिली अन् कॅमेऱ्याचे फ्लॅश त्यांच्यावर पडले . पण का कुणास ठाऊक दोघंही गाडीत आपले चेहरे लपवण्याची अक्षरशः कसरत करतना दिसले. खरंतर सुहानासाठी आणि कदाचित तिच्यासोबत राहणाऱ्या तिच्या मित्रपरिवारासाठी ही नेहमीची सवयीची गोष्ट असेल. पण मग त्या दोघांनी चेहरा का लपवला? यावरनं सोशल मीडियावर नेटकरी वेगवेगळे अंदाज लावताना दिसत आहेत.

आता या फोटोवरनं कुणी म्हटलं की,'तो मुलगा सुहानाचा बॉयफ्रेंड असेल तर नवल नसावे'. सुहाना नुकतीच आपला भाऊ आर्यन खानसोबत आयपीएलच्या ऑक्शनमध्ये दिसली होती. कोलकाता नाइट रायडर्स टीमला प्रेझेंट करण्यासाठी ते उपस्थित होते. तेव्हा जुही चावलानं आर्यन,सुहाना आणि स्वतःची त्यावेळी हजर असलेली मुलगी जान्हवी हे कोलकाता नाइट रायडर्सचं वर्तमान आणि भविष्य असल्याचं जाहिर केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT