shah rukh mannat 
मनोरंजन

शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्याची आताची किंमत वाचून तुमचे डोळे विस्फारतील!

शाहरुखने हा बंगला विकत घेतल्यानंतर चार वर्षांसाठी त्याचं नाव 'विला विएना' असंच होतं. नंतर २००५ मध्ये शाहरुखने ते नाव बदलून 'मन्नत' असं ठेवलं.

स्वाती वेमूल

मुंबईतील बॉलिवूड कलाकारांचे बंगले हे त्यांच्या चाहत्यांसाठी आकर्षणाचं विषय असतं. परराज्यातून येणारे अनेक चाहते या सेलिब्रिटींची घरं पहायला उत्सुक असतात. मुंबईतील वांद्रे इथं बॉलिवूडचा 'किंग' अर्थात अभिनेता शाहरुख खानचा Shah Rukh Khan 'मन्नत' Mannat हा आलिशान बंगला आहे. त्याचा बंगला पाहण्यासाठी अनेक चाहते तिथं गर्दी करतात. शाहरुख जेव्हा दिल्लीहून मुंबईला आला, तेव्हा त्याच्या खिशात फक्त ३०० रुपये होते. तोच किंग खान आता कोट्यधीश आहे.

जेव्हा शाहरुखने बंगला विकत घेतला त्यावेळी बंगल्याची किंमत जवळपास १३.२ कोटी रुपये इतकी होती. गुजराती व्यावसायिक नरिमन दुबाश यांच्या मालकीचा तो बंगला होता. २००१ मध्ये शाहरुखने बंगल्याच्या मालकाची भेट घेतली आणि बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर त्याने 'बाई खोर्शिद भानू संजना ट्रस्ट'कडून हा बंगला विकत घेतला. आताच्या घडीला 'मन्नत'ची किंमत ही तब्बल २०० कोटी रुपयांच्या घरात आहे. ६००० चौरस फुटांच्या या बंगल्यात अनेक सोयीसुविधा आहेत. बेडरुम, लिव्हिंग रुम, जिम, खासगी बार, लायब्ररी, प्लेरुम हे सर्वकाही त्यात असून बंगल्याचं इंटेरिअर शाहरुखची पत्नी गौरी खानने केलं आहे.

"येस बॉस चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी माझ्या मनात मन्नत हा बंगला विकत घेण्याची इच्छा होती. कारण पाहताचक्षणी तो बंगला माझ्या मनात भरला होता. त्यावेळी त्याला 'विला विएना' नावाने ओळखलं जायचं", असं शाहरुखने एका मुलाखतीत सांगितलं होतं. शाहरुखने विकत घेतल्यानंतरही चार वर्षांसाठी या बंगल्याचं नाव 'विला विएना' असंच होतं. नंतर २००५ मध्ये शाहरुखने बंगल्याचं नाव 'मन्नत' असं ठेवलं. हाच बंगला आता अनेकांसाठी सेल्फी पॉईंट ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

Cutlet Paratha: एकदा बनवाल तर घरच्यांची फर्माईश ठरलेली! असा बनवा स्वादिष्ट कटलेट पराठा

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

अस्थिबोध : अवघड शस्त्रक्रिया; पण नियोजन अचूक!

SCROLL FOR NEXT