shahir sable grandmother punished him for stop singing struggle career real life Maharashtra Shaheer movie
shahir sable grandmother punished him for stop singing struggle career real life Maharashtra Shaheer movie sakal
मनोरंजन

Maharashtra Shaheer: शिक्षा भोगली, तापलेल्या तव्यावर उभे राहिले, पण गाणं सोडलं नाही.. शाहीर साबळेंचा खास किस्सा..

नीलेश अडसूळ

शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे (shahir sable) म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने प्रेम केलं. त्यांचं महाराष्ट्र गीत असो, खंडोबाचा जागर किंवा कोळी गीत.. प्रत्येक गाणं हे माणसाच्या काळजात हात घालणारं.

शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली 'महाराष्ट्राची लोकधारा' आजही अनेकांच्या स्मरणात आहे. शाहीर साबळे यांच्या पश्चात हा वारसा त्यांचा नातू म्हणजेच दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) पुढे नेत आहेत. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट आज २८ एप्रिल २०२३ रोजी रिलीज झाला आहे. या निमित्ताने पाहूया त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाची घटना..

(shahir sable grandmother punished him for stop singing struggle career real life Maharashtra Shaheer movie)

शाहीर साबळे यांनी लोकधाराच्या माध्यमातून अनेक कलाकार घडवले. शाहीर हे असं नाव होतं ज्यांचा शासन दरबारीही आदब होता. पण ज्या कलेमुळे शाहीर प्रसिद्ध झाले त्याच कलेला त्यांच्या घरच्यांनी कसून विरोध केला. अगदी त्यांनी गाणं सोडावं म्हणून नाना प्रयत्न केले. पण ऐकतील ते शाहीर कसले त्यांनी अनेक शिक्षा भोगल्या पण शाहीरी सोडली नाही.

कलाकार म्हणून घडत असताना त्यांचा हा प्रवास मात्र मुळीच सोपा नव्हता. अगदी घरातूनच त्यांना गाण्याला विरोध पत्करावा लागला. शाहीर साबळे यांची लेक वसुंधरा साबळे यांनी या चित्रपटाचे कथानक लिहिले आहे, त्यामुळे बाबांच्या खडतर प्रवासाच्या त्या साक्षीदार आहेत. शाहिरांच्या बालपणीपासूनचा किस्सा या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. शाहिरांच्या आज्जीच्या भूमिकेत अभिनेत्री निर्मिती सावंत झळकणार आहेत. निर्मिती सावंत या चित्रपटात विरोधी भूमिकेत पाहायला मिळतील, ते कसे? , तर हा किस्सा वाचल्यावर तुम्हाला त्यांच्या पात्राची ओळख होईल.

अगदी त्यांना गाणं सोडावं म्हणून तापलेल्या तव्यावरही उभं करण्यात आलं होतं पण त्यांनी गाणं सोडलं नाही. शाहीर साबळे यांच्या कन्या वसुंधरा साबळे यांनी एक किस्सा सांगताना म्हटले आहे की, “शाहीर साबळे यांनी अमळनेरची कडक स्वभावाची आजी..शिक्षणासाठी तीच्याकडे राहीलेल्या छोट्या क्रुष्णाला म्हणजे शाहीर साबळे यांना गाण्या पासून दूर ठेवण्या साठी तिने त्याला अक्षरशः तापल्या तव्यावर उभ ठेवण्या इतका कडक स्वभाव वापरला.. तीचा स्वभावही मुळचा तसाच होता म्हणा..'

'घरची आर्थिक परीस्थीती उत्तम होती तरीही हात सैल नव्हता..गाडगेबाबांनी तीच्याकडे क्रुष्णाला मागीतलं तेंव्हा शक्य तीतक गोड बोलत तीने त्यांना नकार दिला पण सानेगुरुजी एका कार्यक्रमासाठी दरवाजात तीच्याकडे क्रुष्णाची रदबदली करायला आले तेंव्हा तीने त्यांना अक्षरशः हाकलून लावलं.'

पुढे त्या म्हणतात, 'ही घटना क्रुष्णाच्या बालमनाला इतकी लागली की आजीबद्दल कायमचा तिरस्कार भरला त्याच्या मनात.. शेवटी सातवीची फायनल परीक्षा देण्यासाठी तीन रुपये देण्यास तीने नकार दिला आणि क्रुष्णा अत्यंत दु:खाने तीथून पसरणीला निघून आला.. '

हा किस्सा चित्रपटात देखील दाखवण्यात आला आहे. अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी शाहीर साबळेंच्या आजीची भूमिका केली आहे. शाहीर साबळे हे वादळ होतं असं म्हणतात. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून असे अनेक किस्से उलगडणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT