shahrukh Khan Jawan trailer was screened at Burj Khalifa in Dubai 
मनोरंजन

Jawan Trailer: बादशाहचा दुबईत जलवा! जवानचा ट्रेलर झळकला बुर्ज खलिफावर; हजारो चाहत्यांची उपस्थिती...

Vaishali Patil

Jawan Trailer Burj Khalifa Dubai:  सध्या शाहरुख खान हा त्याच्या आगामी चित्रपट जावनमुळे चर्चेत आहे. काल जवानचा ट्रेलर रिलिज करण्यात आला ज्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. केवळ एका तासातच ट्रेलरला मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले होते.

भारतात जलवा दाखवल्यानंतर शाहरुख खानच्या जवानचा दमदार ट्रेलर दुबईच्या बुर्ज खलिफा येथे लॉन्च करण्यात आला आहे. बुर्ज खलिफावर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करून टिमने मोठी घोषणा केली.

शाहरुखची संपूर्ण टीम यावेळी दुबईला उपस्थित होती. या वेळी शाहरुखने चित्रपटातील जिंदा बंदा गाण्यावर जोरदार नृत्य केले. याशिवाय चित्रपटातील 'चलेया' या गाण्याचे अरेबिक व्हर्जनही लाँच करण्यात आले.

यावेळी शाहरुखच्या 20000 हून अधिक चाहत्यांच्या उपस्थितीत बुर्ज खलिफा येथे जवानचा ट्रेलर लॉन्च केला. बुर्ज खलिफावरील जवानाचा ट्रेलर पाहून चाहत्यांनी एकच जल्लोष केला. ट्रेलर बुर्ज खलिफा येथे सकाळी 10:30 आणि रात्री 9:00 वाजता जीएसटीवर जवानाचा हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला.

यादरम्यान शाहरुख खानने या चित्रपटातील त्याच्या पाच वेगवेगळ्या लूकबद्दल सांगितले. यादरम्यान शाहरुख म्हणाला, " मी या चित्रपटासाठी टकला झालो आहे.मी माझ्या आयुष्यात यापूर्वी असं कधीच केलं नव्हतं. बघा, तुम्हा लोकांसाठी मी टक्कल झालोय, त्याचा आदर करा आणि चित्रपट पाहण्यासाठी जा नंतर अशी संधी मिळते की नाही सांगता येत नाही"

गुरुवारी रिलिज करण्यात आलेल्या जावनच्या ट्रेलरने आता प्रेक्षकांची उत्सूकता शिगेला पोहचवली आहे. बुधवारी शाहरुखने चेन्नईत जवानच्या ऑडिओ लॉन्चला अॅटली, अनिरुद्ध रविचंदर, विजय, योगी बाबू, सान्या मल्होत्रा ​​आणि प्रिया मणी राज यांच्यासोबत हजेरी लावली होती.

जवान या चित्रपटाचे दिग्दर्शन अटली कुमार यांनी केले आहे. शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती यांची मुख्य भूमिका असलेला जवान ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

यांच्याशिवाय दीपिका, सान्या मल्होत्रा ​​यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी या चित्रपटातून पदार्पण केले आहे. जवान हा हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

SCROLL FOR NEXT