Shahrukh Khan,pooja Dadlani birthday,king khan manager know profile  Instagram
मनोरंजन

Shahrukh Khan: बायकोइतकीच शाहरुखच्या आयुष्यात महत्वाची आहे 'ती', कोण आहे पूजा ददलानी?

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज केसमध्ये अडकल्यानंतर पूजा ददलानी हे नावही जोरदार चर्चेत आलं होतं. पूजा त्यावेळी सावलीसारखी शाहरुखसोबत दिसली होती.

प्रणाली मोरे

Shahrukh Khan Birthday:असं म्हणतात अनेकदा काही नाती ही रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट असतात. शाहरुखच्या बाबतीतही असंच काहीसं आहे. गौरी खान व्यतिरिक्त अशी आणखी एक महिला आहे ,जी शाहरुखच्या सुख-दुःखात नेहमी त्याच्यासोबत उभी दिसते. (Shahrukh Khan,pooja Dadlani birthday,king khan manager know profile)

ही महिला दुसरी-तिसरी कोणी नसून शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी आहे. शाहरुख खान आपली मॅनेजर पूजा ददलानीसोबत खूप खास बॉन्ड शेअर करतो. पूजा ददलानी शाहरुखसोबत सावलीसारखी असते असं म्हटलं तर अतिश्योक्ती नक्कीच होणार नाही. योगायोगानं दोघांचा वाढदिवसही एकाच दिवशी असतो. आज २ नोव्हेंबर जसा शाहरुखचा वाढदिवस आहे,त्याच दिवशी त्याची मॅनेजर पूजा ददलानीचा देखील वाढदिवस असतो. चला,यानिमित्तानं जाणून घेऊया पूजा ददलानी विषयी खास गोष्टी.

पूजा ददलानी शाहरुख खानची मॅनेजर आहे. पूजाचा जन्म २ नोव्हेंबर १९८३ साली झाला आहे. पूजा गेल्या १० वर्षांपासून शाहरुखची मॅनेजर म्हणून काम पाहत आहे. पूजा २०१२ पासून शाहरुखचं काम पाहत आहे. पूजा शाहरुखच्या रेड चिली कंपनीचं काम पाहतानाच त्याच्या आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर्सचं काम देखील मॅनेज करते.

Shahrukh Khan,pooja Dadlani birthday,king khan manager know profile

शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी त्याची पत्नी गौरी खानसोबत देखील खास बॉन्ड शेअर करते. इतकंच नाही तर सुहाना-आर्यनसोबतही तिचं खास ट्युनिंग आहे.

रिपोर्ट्सनुसार माहिती समोर येत आहे की पूजानं शाहरुखच्या 'चेन्नई एक्सप्रेस' सिनेमाला को-प्रोड्युस केलं होतं. या सिनेमात किंग खान आणि दीपिका पदूकोण मुख्य भूमिकेत होते.

Shahrukh Khan,pooja Dadlani birthday,king khan manager know profile

पूजा केवळ शाहरुखची मॅनेजर नाही तर ती त्याच्या कुटुंबाचाच एक भाग असल्यासारखी आहे. शाहरुखच्या आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगी पूजा त्याच्यासोबत उभी दिसली. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातही पूजानं शाहरुखला खूप पाठिंबा दिल्याचं त्याने स्वतःच स्पष्ट केलं होतं.

Shahrukh Khan,pooja Dadlani birthday,king khan manager know profile

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या सुनावणी दरम्यानं भावूक झालेल्या पूजाचे फोटो व्हायरल झाले होते. आर्यनला अडचणीत सापडल्याचं पाहून ती रडली देखील होती. पूजा देखील आपल्या सोशल मीडियावर शाहरुखसोबतचे आणि त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करताना दिसते. शाहरुखच्या फिल्म इंडस्ट्रीतील जवळच्या मित्र-मैत्रिणींसोबत म्हणजे करण जोहर,फराह खानसोबतही पूजाचे जवळचे संबंध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon :खडसेंच्या घरात चोरी! ५ तोळं सोनं आणि ३५ हजार लंपास; एकनाथ खडसे म्हणाले, जळगावात पोलिसांचा धाक राहिला नाही

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

UP Encounter: योगींच्या पोलिसांनी एका शहरात केले डबल एनकाऊंटर! तिघांच्या पायाला गोळी; गुन्हेगारीचा मोठा इतिहास!

Arjun Tendulkar: 4,4,4,4,4,4,6! अर्जुनच्या फटकेबाजीमुळे गोवा संघाचा कमबॅक; आधी ३ विकेट्स घेऊन कर्नाटकला दिलेले धक्के...

Sugarcane Dispute : आमदार यड्रावकरांच्या कारखान्याची ऊस वाहतूक रोखली, पोलिसांची अरेरावी; पोलिस निरिक्षकानेच आंदोलकांना दिल्या शिव्या...

SCROLL FOR NEXT