Shamika Bhide and Swarangi Marathe sakal
मनोरंजन

दिल, दोस्ती : गाण्यातून जुळल्‍या मैत्रीच्या तारा!

कलेची आवड दोन व्यक्तींना जवळ आणते, असं म्हणतात. कलेबद्दलच्या याच प्रेमामुळं घट्ट मैत्रिणी झालेल्या दोन गायिका-अभिनेत्री म्हणजे शमिका भिडे आणि स्वरांगी मराठे.

सकाळ वृत्तसेवा

कलेची आवड दोन व्यक्तींना जवळ आणते, असं म्हणतात. कलेबद्दलच्या याच प्रेमामुळं घट्ट मैत्रिणी झालेल्या दोन गायिका-अभिनेत्री म्हणजे शमिका भिडे आणि स्वरांगी मराठे.

- शमिका भिडे, स्वरांगी मराठे

कलेची आवड दोन व्यक्तींना जवळ आणते, असं म्हणतात. कलेबद्दलच्या याच प्रेमामुळं घट्ट मैत्रिणी झालेल्या दोन गायिका-अभिनेत्री म्हणजे शमिका भिडे आणि स्वरांगी मराठे. त्यांच्या गुरू डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्याकडे त्या दोघींनी गायनाची तालीम घ्यायला एकाच वेळी सुरुवात केली आणि तेव्हा त्यांची ओळख झाली. स्वरांगी आणि शमिकाचा क्लास पाठोपाठ असायचा. त्या दोघीही एकमेकींच्या क्लासच्या वेळी एकमेकींचं गाणं ऐकायला थांबायच्या. पुढं त्यांच्यातलं हे ट्युनिंग बघून डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांनी दोघींना एकत्रच गाणं शिकवायला सुरुवात केली आणि त्यांची मैत्री घट्ट होत गेली. गेले एक तप त्या एकमेकींना ओळखतात.

स्वारंगी म्हणाली, ‘मी ‘सा रे ग म प’च्या वेळी शमिकाचं गाणं पहिल्यांदा ऐकलं. त्यामुळं तिला भेटण्याच्या आधीपासूनच ती मला माहीत होती. आमची इतकी घट्ट मैत्री होईल, असं त्यावेळी मला अजिबात वाटलं नव्हतं. तेव्हाही ती आता जशी आहे तशीच हसरी, आनंदी, मनमोकळ्या स्वभावाची होती. आमची घट्ट मैत्री झाल्यावरही तिच्या स्वभावात मला काहीही बदल जाणवला नाही. तिला कार्यक्रमांमुळं विविध ठिकाणी राहावं लागतं. पण दुसऱ्यांकडं राहताना तिची कधीच कुठलीही तक्रार नसते. ती खूप पटकन अॅडजेस्ट होते. ती ज्या घरी जाईल त्या घरची होऊन जाते. तिच्यातला हा गुण मला मी गेल्या काही वर्षांत आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे. ती कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करत नाही, ही तिच्यातली आणखीन एक चांगली गोष्ट. शमिका स्वतःला खूप चांगल्याप्रकारे प्रेझेंट करते.

सोशल मीडियावरही ती अॅक्टिव्ह राहून तिची गाणी, तिनं केलेले नवीन प्रयोग ती लोकांपर्यंत पोहोचवत असते. त्या मानानं मी सोशल मीडियावर फारच कमी अॅक्टिव्ह असते. ‘स्वतःमध्ये असलेली कला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हे चांगलं माध्यम आहे, तू त्यावर अॅक्टिव्ह राहत जा,’ असं ती मला अनेकदा सांगत असते. ती खूप फोकस्ड आहे. आम्ही अनेकदा एकत्र रियाज करतो, अनेक कार्यक्रम आम्ही एकत्र केले आहेत. माझा कल पूर्णपणे शास्त्रीय गायकाकडे आहे आणि शमिका शास्त्रीय गायनासोबत उप शास्त्रीयही गाते. अशाप्रकारे कार्यक्रमात आणि मैत्रीतही एकमेकींच्या कमी अधिक गुणांना सांभाळून घेत आम्ही ते भरून काढत असतो.’’

शमिकाने सांगितलं, ‘काही वर्षांपूर्वी नवनीतच्या जाहिरातीत स्वरांगी दिसायची, ‘आभाळमाया’ मालिकेतही तिने काम केलं. मी तिला ओळखू लागले तिच्या अभिनयामुळं. त्यानंतर गाण्यामुळं आमची भेट झाली. एक सहकलाकर म्हणून स्वरांगी समोरच्याला खूप सांभाळून घेणारी आहे. तिची स्पर्धात्मक वृत्ती नाहीये. प्रत्येकाला बरोबर घेऊन जाण्याचा तिचा स्वभाव आहे. त्यामुळं आम्हाला एकत्र कार्यक्रम करायला खूप मजा येते. ती उत्तम अभिनेत्री आहे आणि उत्तम गायिकाही. ती अतिशय शांत आहे. कोणत्याही गोष्टीचा सखोल विचार केल्याशिवाय ती कोणताही निर्णय घेत नाही. तशीच ती खूप प्रेमळही आहे. तिला माणसांची खूप ओढ आहे, सगळ्यांनी आपल्याकडे यावं, असं तिला नेहमी वाटत असतं. कोणीही तिच्याकडं गेल्यावर अत्यंत आपुलकीने ती त्या व्यक्तीशी बोलते. तिला लहान मुलं फार आवडतात; त्यामुळं त्यांच्याशी बोलताना लागणारी निरागसताही तिच्यात आहे. ती खूप संस्कारी आहे. घर आणि तिचं करिअर हे ती उत्तमप्रकारे सांभाळते. या दोन्ही गोष्टींना ती समान प्राधान्य देते आणि तिचा हा गुण मला शिकायला आवडेल. आम्ही दोघी भेटल्यावर खूप धमाल करतो. गाण्यामुळं आमच्या मैत्रीचा धागा घट्ट झालाच आहे, पण त्याव्यतिरिक्त आमची फिरण्याची आवड, शॉपिंगची आवड, दोघींची मजा मस्करी करण्याची सवय यामुळं आमची मैत्री आणखीन बहरत गेली.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पुणे-बीडमध्ये वर्दीची भीती उरली नाही

Jalgaon Politics : सगळ्यांना मामा बनवणारे जिल्हाधिकारी!; गिरीश महाजन यांच्या कोपरखळीने सभागृहात हंशा

SCROLL FOR NEXT