sharad ponkshe wear saree in daar ughad baye serial on zee marathi big twist  sakal
मनोरंजन

Sharad Ponkshe: कपाळी कुंकू, नाकी नाथ.. शरद पोंक्षे चक्क साडीत? काय आहे भानगड?

अभिनेते शरद पोंक्षे प्रथमच अशा भूमिकेत, मालिकेत होणार पुरुषी अहंकाराचा अंत..

नीलेश अडसूळ

daar ughad baye: सध्या 'झी मराठी' वरील 'दार उघड बये' ही मालिका जोरदार चर्चेत आहे. या मालिकेत अभिनेते शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत आहेत. अत्यंत ताठर, कठोर आणि पुरुषी अहंकाराने भरलेल्या रावसाहेब नगरकरांची ते भूमिका साकारत आहेत. महिलांना कमी लेखणाऱ्या या पुरुषाचे आता गर्वहरन होणार आहे. या भागादरम्यान अभिनेते शरद पोंक्षे यांनी चक्क साडी नेसून स्त्री वेश केला. त्यामुळे मालिका आता प्रचंड उत्कंठा वर्धक वळणावर पोहोचली आहे.

(sharad ponkshe wear saree in daar ughad baye serial on zee marathi big twist )

आंतरजातीय विवाह केल्याने रावसाहेब आपल्या मुलाला आणि सून मुक्ता हीला घरातून हाकलून देतात. शिवाय त्यांच्यावर नाना पद्धतीने अत्याचार करतात. त्यांच्या या पुरुषी मक्तेदारीला छेद देऊन घरातील स्त्रियांना सन्मान मिळवून देण्यासाठी मुक्ता आता झटणार आहे.

या मालिकेत रोज काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळतोय. मुक्ता सांरंगचा गृहप्रवेश झाल्यानंतर रावसाहेब मुक्ताच्या पावलांचा ठसा असलेलं कापड जाळून टाकतात. कोंडून ठेवलेल्या सारंगच्या आईला म्हणजेच वैजयंतीला रावसाहेब सारंग आणि मुक्ताला भेटू देत नाहीत. तर इकडे आर्याचे आई बाबा नगरकरांच्या घरी येतात, रावसाहेब त्यांना शब्द देतात की आर्याच नगरकरांची सून म्हणून या घरात दिसेल आणि तसं झालं तर मी स्वतः रावसाहेब बाईचा वेश घालून हातात बांगड्या भरून दिवसभर घरात फिरेन.

रावसाहेब मुक्ता-सारंगसमोर प्रत्येकवेळी नवीन आव्हानं उभी करणार आहेत आणि या आव्हानांना मुक्ता सडेतोड उत्तर देणार आहे, यात तिला नवऱ्याची म्हणजेच सारंगची साथ मिळणार आहे, मुक्ता ने स्विकारलेल्या प्रत्येक आव्हानांमुळे कुठंतरी रावसाहेबांचा पुरुषी अहंकार दुखावला जाऊन ते अतिशय खालच्या पातळीला उतरणार आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणजे रावसाहेब स्वतःला घरातल्यांसमोर बाईच्या वेशात हातात बांगड्या घालून फिरताना आरशात बघणार आहेत. त्यामुळे मालिकेत हा मोठा ट्विस्ट पाहायला चाहते भलतेच उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT