Shehnaaz Gill Google
मनोरंजन

केसांत गजरा माळून दिसली शेहनाझ, 'कभी ईद,कभी दिवाली' च्या सेटवरुन Video Leak

सलमान खानच्या 'कभी ईद,कभी दिवाली' या सिनेमातून शहनाझ गिल बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे.

प्रणाली मोरे

आपल्या क्यूट अंदाजानं 'बिग बॉस'(Big Boss) मधून अनेक चाहत्यांना घायाळ करणारी पंजाबी सिनेमाची अभिनेत्री शहनाझ गिल(Shehnaaz Gill) बॉलीवूडमध्ये(Bollywood) पदार्पण करतेय अशी बातमी कानावर पडलीच होती. त्यातही सलमान खानच्या(Salman Khan) सिनेमात ती दिसणार असल्यामुळे त्याची अधिक चर्चा रंगली. अर्थात याविषयी ना सलमानकडून ग्रीन सिग्नल मिळाला होता ना शहनाझनं चुप्पी तोडली होती. पण मागे मुंबई एअरपोर्टवर तिनं आपल्या स्माईलमधून याविषयी नकळत ईशारा दिला होता. पण जोपर्यंत कोणी बोलत नाही तोवर खरं कसं मानायचं. पण आता मात्र शहनाझ सलमानच्या 'कभी ईद-कभी दिवाली' सिनेमातनं बॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय याचा जिवंत दाखलाच मिळाला आहे ना राव. आम्ही तुम्हाला दाखवतो थेट सेटवरुन लीक झालेला तो व्हिडीओ. चला याविषयी थोडं सविस्तर जाणून घेऊया.

सलमान खानच्या 'कभी ईद-कभी दिवाली' (Kabhi Eid,Kabhi Diwali) सिनेमात शहनाझ काम करतेय हे कळल्यावर तिच्या चाहत्यांना उत्सुकता होती ते तिच्या लूकची. अर्थात बातमी कन्फर्म होण्याआधीच ही उत्सुकता होती बरं का. आता नुसती बातमी कन्फर्म नाही झाली तर 'कभी ईद कभी दिवाली'च्या सिनेमाच्या सेटवरुन शहनाझचा लूक समोर आणणारा एक व्हिडीओच लीक झाला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे.

व्हिडीओमध्ये शहनाझ गिल वॅनिटी व्हॅनमधून बाहेर येताना दिसत आहे. शहनाझनं साडी नेसली आहे. तिनं केसात गजरा माळलेला आहे. तिचा हा लूक पाहून तिचे चाहते मात्र भलतेच खूश झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार शहनाझ 'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमात आयुष शर्मासोबत दिसणार आहे.

'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमातील सलमान खानचा लूक देखील समोर आला आहे. मोठे वाढवलेले केस आणि अॅक्शन अंदाजातील त्या लूकमध्ये ज्यानं सलमानला पाहिलं तो फक्त पाहतच राहिला. आता सिनेमाच्या सेटवरुन आधी सलमान आणि त्यानंतर आता शहनाझ गिलचा समोर आलेला लूक पाहून चाहते आता सिल्व्हर स्क्रीनवर दोघांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. शहनाझ व्यतिरिक्त सलमान खानच्या या सिनेमात पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT