Shreyas talpade and jitendra joshi shared memories about career struggle and swami samarth maharaj in khupte tithe gupte show sakal
मनोरंजन

Shreyas Talpade: त्या दिवशी स्वामींच्या मठात डोकं टेकलं आणि.. श्रेयस तळपदेचा थक्क करणारा अनुभव..

अभिनेता श्रेयस तळपदे आणि जितेंद्र जोशी यांच्या करियरमधील हा किस्सा तुम्हालाही प्रेरणा देईल..

नीलेश अडसूळ

Shreyas Talpade Birthday: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने विशेष ओळख निर्माण करणारा कलाकार म्हणजे श्रेयस तळपदे (Shreyas Talpade). आज श्रेयसने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

श्रेयसने बॉलीवुड गाजवलं तरी आजही तो आवर्जून मराठी मालिकांमध्येही काम करतो, त्यामुळे तो अधिकच प्रेक्षकांच्या जवळ गेला आहे. एवढेच नाही तर तो प्रचंड साधा आणि सर्वांशी प्रेमाने वागणारा अभिनेता अशी त्याची ख्याती आहे.

आज जरी त्याने हे यश मिळवलं असलं तरी, त्याच्यासाठी हा स्ट्रगल सोपा नव्हता. त्याने खूप मेहनत घेतली आहे. पण त्याच्या यशामध्ये त्याला साथ दिली ते स्वामी समर्थ महाराजांनी. याचाच किस्सा त्याने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला आहे.

( Shreyas talpade and jitendra joshi shared memories about career struggle and swami samarth maharaj in khupte tithe gupte show)

सध्या अवधूत गुप्ते याच्या 'खुपते तिथे गुप्ते' या शोची प्रचंड चर्चा आहे. मागील भागात या शो मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. ही मुलाखत भन्नाट गाजली. आता आगामी भागात अभिनेता श्रेयस तळपदे 'खुपते तिथे गुप्ते' मध्ये झळकणार आहे.

याचा एक प्रोमो आता शेयर करण्यात आला आहे. ज्यामध्ये श्रेयस त्याच्या आयुष्यातील खडतर अनुभवांविषयी बोलला आहे. श्रेयसच्या या भागात त्याचा खास मित्र जितेंद्र जोशी याला व्हिडिओ कॉल करणार आहे. या व्हिडिओ कॉलमध्ये जितेंद्र आणि श्रेयसच्या एकत्र करियरची सुरुवात कशी केली, यावर गप्पा मारल्या आहेत.

यावेळी जितेंद्र जोशीने श्रेयसच कौतुक केलं आहे, तो म्हणाला की, 'श्रेयस विषयी बोलण्यासारखं खूप आहे, अनेक गोष्टी आहेत... माझ्याकडं काम नव्हतं तेव्हा आपल्या मित्राकडं सतिश राजवाडे याच्याकडं मला घेऊन जाणारा तूच होतास,' असं जितू म्हणाला.

सोबत जितेंद्रनं आणखी एक भावनिक किस्साही सांगितला. तो म्हणाला की, 'मला एक किस्सा आजही चांगला आठवतो. तुझी आई तुला म्हणाली होती की, नाटक करून काही होत नाहीये. आता नोकरी कर कुठं तरी. तेव्हा आपण दोघं स्वामी समर्थांच्या मठात गेलो होतो. आपण दोघांनी मिळून स्वामींना प्रार्थना केली. त्यानंतर जे झालं ते अख्ख्या महाराष्ट्रानं अन् देशानं पाहिलं....' असं तो म्हणाला.

जितेंद्र हे सगळं बोलत असताना श्रेयसला जुन्या आठवणी आठवल्याने त्याचे डोळे पाणावले. मग श्रेयसनही जितू विषयीच्या अनेक आठवणी सांगितल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT