Shilpa Shetty and Raj Kundra
Shilpa Shetty and Raj Kundra Instagram
मनोरंजन

पहिल्या पत्नीच्या अफेअरबाबत राजच्या मुलाखतीवर शिल्पा शेट्टी नाराज

स्वाती वेमूल

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty पती राज कुंद्रा Raj Kundra याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूर्वाश्रमीच्या पत्नीबद्दल मोठा खुलासा केला. मेहुण्यासोबत तिचे अफेअर असल्यामुळे घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचं राजने सांगितलं. यानंतर आता शिल्पा शेट्टी राजवर नाराज असल्याचं कळतंय. पूर्वाश्रमीची पत्नी कविताबद्दल आणि घटस्फोटाबद्दल राजने माध्यमांशी बोलायला पाहिजे नव्हतं, असं शिल्पाचं मत आहे. राज आणि कविता यांनी २००६ मध्ये घटस्फोट घेतला. इतक्या वर्षांनंतर पहिल्यादाच राजने घटस्फोटाच्या कारणांबाबत मौन सोडलं. त्याचसोबत पहिल्या पत्नीवर मेहुण्यासोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्याचे आरोप केले. (Shilpa Shetty is upset after Raj Kundra spoke about ex wife)

"शिल्पाच्या विरोधातील कविताची जुनी मुलाखत पुन्हा व्हायरल झाली. मात्र त्यावर मी काहीच बोलू नये असं तिचं मत होतं. शिल्पाच्या वाढदिवसानंतर पुन्हा ती मुलाखत चर्चेत आली होती. ते वाचून माझी पुन्हा चिडचिड झाली. मला सर्व गोष्टी समोर आणायच्या होत्या, सत्य हे समोर येणारच होतं. ११ वर्षांपूर्वीच्या सर्व गोष्टी मोकळेपणाने बोलून माझं मन फार हलकं झालं. माझ्या आईने मेहुण्याला आणि कविताला रंगेहात पकडलं होतं. दोन्ही कुटुंब उध्वस्त करताना त्यांनी एकदाही विचार केला नव्हता", असं राज म्हणाला.

'पिंकविला' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत राज म्हणाला, "घरात मी आई-बाबा, बहीण आणि मेव्हण्यासोबत राहायचो. त्याला युकेमध्ये व्यवसाय करायचा होता, म्हणून बहिणीसोबत तो आमच्या घरातच राहत होता. त्यावेळी कविताने त्याच्यासोबत जवळीक साधली. मी जेव्हा बिझनेस ट्रिपला जायचो, तेव्हा ती त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करायची. माझ्या कुटुंबीयांना आणि ड्राइव्हरलाही त्या दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याची शंका होती. नंतर माझी बहीण आणि मेहुणा भारतात परतले, पण तेव्हासुद्धा कविताचा त्याच्याशी संपर्क होता. बाथरुममध्ये तिने एक फोन लपवला होता आणि त्याद्वारे ती त्याच्याशी संपर्क साधत होती."

राज आणि कविता यांनी २००३ मध्ये लग्न केलं आणि लग्नाच्या तीन वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००९ मध्ये राजने शिल्पा शेट्टीसोबत लग्न केलं. राज आणि शिल्पाला दोन मुलं आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT