Shiv Thakare tv entertainment bigg boss 16 runner up
Shiv Thakare tv entertainment bigg boss 16 runner up  esakal
मनोरंजन

Shiv Thakare : 'ते रोज मला रात्री ११ वाजता...' शिव ठाकरेनं सांगितलं कास्टिंग काऊचचे भयानक सत्य!

सकाळ डिजिटल टीम

Shiv Thakare tv entertainment bigg boss 16 runner up : बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी शिव ठाकरेला मोठी लोकप्रियता मिळाली होती. त्याची टक्कर एमसी स्टॅनसोबत होती. मात्र प्रेक्षकांनी स्टॅनला विजेता म्हणून निवडून दिलं. मात्र त्यामुळे शिवच्या लोकप्रियतेमध्ये काहीही फरक पडला नाही. मराठी बिग बॉसचा विजेता असणाऱ्या शिवचा सोशल मीडियावर असणारा चाहतावर्ग मोठा आहे. त्याला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

शिवनं त्याच्या एका मुलाखतीमध्ये कास्टिंग काऊचविषयी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. त्यामध्ये त्यानं केलेलं विधान हे चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय झालेल्या शिवनं त्याला देखील कास्टिंग काऊचचा सामना करावा लागल्याचे सांगितले आहे. त्याच्या त्या अनुभवानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मनोरंजन विश्वामध्ये कशाप्रकारे कास्टिंग काऊच चालते हे त्यानं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता रवि किशननं कास्टिंग काऊचवरुन एक धक्कादायक खुलासा केला होता.

Also Read - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

बिग बॉसच्या १६ व्या पर्वाचा फर्स्ट रनर अप म्हणून शिवनं चाहत्यांची अमाप लोकप्रियता मिळवली होती. शिवनं नुकतीच ३० लाख रुपये किंमतीची हॅरिअर गाडी घेतली होती. त्याचे फोटो त्यानं सोशल मीडियावर शेयर केले होते. त्यावरुन चाहत्यानं त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला होता. शिवनं एक रेस्टॉरंट देखील सुरु केले आहे. अमरावतीच्या शिवनं त्याच्या मुलाखतीतून एक धक्कादायक खुलासा केला आहे.

शिव म्हणतो, मी आरामनगरमध्ये मुलाखतीसाठी गेलो होतो. तिथे मला बाथरुममध्ये नेण्यात आले होते. मला सांगितले, येथे एक मसाज सेंटर आहे. माझी ऑडिशन आणि ते मसाज सेंटर याचा काही परस्पर संबंध दिसला नाही.

तुम्ही तुमच्या ऑडिशन नंतर याठिकाणी येऊन वर्कआऊट करु शकता. असे सांगिल्यानंतर मी तिथून पळूनच गेलो. असाच एका बंगल्यातील मॅडमनं मला तुला चांगला अभिनेता बनवते असे सांगून फोन करण्यास सुरुवात केली होती. तिनं रात्री मला अकरा वाजता फोन करण्यास सुरुवात केली. बऱ्याच दिवसांपासून ती फोन करतच होती. मला ऑडिशन द्यायला ती बोलवत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT