Shraddha Arya is playing Dayaben in TMKOC Google
मनोरंजन

'तारक मेहता..' ला सापडली नवीन दयाबेन? अभिनेत्री श्रद्धा आर्याचं नाव चर्चेत

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील दयाबेनच्या अंदाजात श्रद्धानं व्हिडीओ शेअर केल्यानंतर तीच नवीन दयाबेन या चर्चेला उधाण आलं आहे.

प्रणाली मोरे

'कुंडली भाग्य' अभिनेत्री श्रद्धा आर्या(Shraddha Arya) आपल्या मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करत असतेच पण सोशल मीडियावरही ती तितकीच सक्रिय पहायला मिळते. इन्स्टाग्रामवर ती जरा जास्तच सक्रिय असते. ती नेहमी आपल्या 'कुंडली भाग्य' मालिकेच्या सहकलाकारांसोबत मस्ती करतानाचे व्हिडीओ शेअर करीत असते. 'कुंडली भाग्य' मालिकेत गेल्या काही वर्षांपासून प्रीता ही व्यक्तिरेखा साकारणारी श्रद्धा आर्या आता दयाबेन(Dyaben) बनण्याच्या तयारीत आहे. श्रद्धा आर्यानं आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे,जो तिच्या चाहत्यांना भलताच पसंत येतोय.(Shraddha Arya is playing Dayaben in TMKOC)

'कुंडली भाग्य' अभिनेत्री श्रद्धा आर्याचा हा व्हिडीओ भलताच मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये ती आपल्या मैत्रिणींसोबत दिसतेय. या व्हिडीओत कपाळावर बिंदी लावून मॅक्सी ड्रेस घातलेली आर्या खूपच सुंदर दिसतेय. या व्हिडीओमध्ये दयाबेनचा फेमस डायलॉग,'तो क्या इरादा है' ची मिमिक्री करुन तिनं दाखवली आहे. एवढंच नाही तर श्रद्धा आर्यानं या व्हिडीओत 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील दयाबेनचे हावभाव देखील अचूक पकडलेले दिसून आले आहे. श्रद्धा च्या या व्हिडीओवर तिचे चाहते मात्र प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. पण एक मात्र आहे श्रद्धाच्या या दयाबेन अंदाजात शेअर केलेल्या व्हिडीओमुळे तिच दयाबेन साकारतेय या चर्चेला मात्र उधाण आलं आहे.

श्रद्धा च्या या मजेदार व्हिडीओवर कमेंट्स करण्यावाचून चाहते स्वतःला थांबवू शकले नाहीत. एकानं लिहिलं आहे, 'श्रद्धा तू दिवसेंदिवस खूपच विनोदी होत चालली आहेस'. तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'तू खूपच क्यूट दिसतेयस'. तर एकानं लिहिलंय,'एक्सप्रेशन की दुकान आहेस तू'. श्रद्धा आर्याच्या या व्हिडीओला आतापर्यंत ६५ हजारहून अधिक लाइक्स मिळालेयत.

श्रद्धा आर्या गेल्या ५ वर्षांपासून एकता कपूरच्या 'कुंडली भाग्य' मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. तिच्यासोबत या शो मध्ये धीरज धूपर मुख्य भूमिकेत आहे. दोघांच्या करण-प्रीताच्या जोडीला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळत आहे. अर्थात आता कदाचित धीरज हा शो सोडतोय अशा बातम्या असल्यामुळे ही जोडी लवकरच तूटेल असंही म्हटलं जात आहे. धीरज धूपरच्या जागी शक्ति अरोरा मुख्य भूमिका साकारणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT