shreya bugde
shreya bugde 
मनोरंजन

'किमान तुझी बायको तरी कुरुप नाही'; नवऱ्यासाठी श्रेया बुगडेची पोस्ट

सकाळ ऑनलाइन

अनेकांच्या हुबेहूब नकला करून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी श्रेया बुगडे महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय आहे. 'फू बाई फू' आणि 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमांमुळे तिच्यातील अभिनयकौशल्याला वाव मिळाला. सोशल मीडियावर सक्रिय असणारी श्रेया चाहत्यांसोबत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर श्रेयाने पती निखिल शेठसाठी खास पोस्ट लिहिली आहे. १ एप्रिल रोजी पतीच्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर करत श्रेयाने ही पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्येही श्रेयाची विनोदबुद्धी लपून राहिलेली नाही. 

'बालपणाची पहिली चाळीस वर्षे ही नेहमीच कठीण असतात याच्याशी तू सहमत असशील अशी मला खात्री आहे. त्यामुळे या चाळीस वर्षांसाठी चिअर्स. तुझ्याकडे मी आहे. त्यामुळे याव्यतिरिक्त तू आणखी काय मागू शकशील माहित नाही. पण नेहमी लक्षात ठेव, की आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले, समस्या आल्या तरी किमान तुझी बायको तरी कुरुप नाही. मला अभिमान आहे की मी एका अशा व्यक्तीशी लग्न केलंय, जो स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी खूप मेहनत घेतो आणि वाढदिवसानिमित्त तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवोत अशी मी प्रार्थना करते. आतापर्यंत मला सहन केलंस यासाठी तुला खूप प्रेम', अशा शब्दांत श्रेयाने तिच्या भावना व्यक्त केल्या. १ एपिल हा 'एप्रिल फूल' मानला जातो. त्यामुळे श्रेयाने पोस्टच्या अखेरीस हेसुद्धा स्पष्ट केलं की खरंच तिच्या पतीचा वाढदिवस आहे. 

२०१५ मध्ये श्रेया आणि निखिलने प्रेमविवाह केला. एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान या दोघांची पहिल्यांदा ओळख झाली. शूटिंगदरम्यान निखिलने अनेकदा श्रेयासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र तसं न होता अनेकदा त्यांच्यात वादच झाले. नंतर निखिल एका मालिकेची निर्मिती करत होता. त्यावेळी श्रेयाने त्याला अभिनंदन करण्यासाठी फोन केला आणि तिथूनच त्यांच्या नात्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

Shivsena : ''मुंबईतल्या ३७ मशिदींमधून भाजपला मतदान न करण्याचे फतवे'' शिवसेनेचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

Monali Thakur : "या दुःखातून मी सावरेन कि नाही..."; आईच्या निधनानंतर गायिकेने शेअर केली इमोशनल पोस्ट

Ulhasnagar News : उल्हासनगरातील 251 मतदान केंद्रावर 1255 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताबा

Snapchat Account Recovery : स्नॅपचॅट डिलीट झालय ? फोटो आणि मेसेज 'असे' मिळवा परत

SCROLL FOR NEXT